मुंबई, 5ऑक्टोबर- हरियाणवी डान्सर सपना चौधरीच्या (Sapna Choudhary) डान्सचे आणि दिलेखेचक अदांचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावरदेखील तिला प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. ती विविध कारणांमुळे कायम प्रकाशझोतात असते. विशेषत: गेल्या वर्षभरात तिचं व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य चर्चेचं कारण राहिलं. कारण गेल्या वर्षी सपना चौधरीनं एका मुलाला जन्म दिला. आज (5 ऑक्टोबर) सपना चौधरीच्या मुलाचा पहिला वाढदिवस आहे. त्यामुळे आजचा दिवस तिच्यासाठी नक्कीच खास आहे. मुलाच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सपनानं आपल्या मुलाच्या नावाची अधिकृत घोषणा केली. यासाठी सपनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक खास व्हिडिओ(Instagram Vdeo) शेअर केला आहे.
View this post on Instagram
सपना चौधरीनं सोशल मीडियावर आपल्या मुलाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये मुलाचा चेहरा दिसत नसला, तरी तो व्हिडिओ वेगानं व्हायरल होत आहे. त्याखाली तिनं कॅप्शन देऊन मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'मेरे और मेरे चाहने वालों की तरफ से जन्मदिन की शुभकामनाए मेरे शेर @porusofficial...', अशी कॅप्शन सपनाने व्हिडिओला दिली आहे. सपना आणि तिचा पती वीर साहू यांनी आपल्या मुलाचं नाव 'पोरस' असं ठेवलं आहे. सपना चौधरीचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. तिच्या चाहत्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून मुलावर आशीर्वाद आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
(हे वाचा:Ranveer Singh बनला NBA चा ब्रँड अँबॅसिडर; बालपणापासूनच आहे बास्केटबॉलवर प्रेम)
सपना चौधरीनं (Sapna Choudhary Video) शेअर केलेल्या मुलाच्या व्हिडिओला तिचा पती वीर साहूनं आवाज दिला आहे. व्हिडिओच्या व्हॉइस ओव्हरसाठी वीरनं अतिशय काळजीपूर्वक लेखन केल्याचं दिसतं. गायक आणि अभिनेता असलेल्या वीर साहूच्या धीरगंभीर आवाजातल्या या व्हिडिओमध्ये त्यांचा मुलगा पौरस जमिनीवर पाठमोरा बसून खेळताना दिसत आहे. लहानगा पोरस न घाबरता गायींच्या कळपामध्ये खेळत आहे. पौरस एका सर्वसामान्य घरात आणि सर्वसामान्य परिस्थितीमध्ये जन्मलेला मुलगा असला तरी तो असामान्य आहे. शूरवीरांच्या भूमीचा वारसा त्याला आहे, अशा शब्दांत वीर साहूनं आपल्या मुलाचं कौतुक केलं आहे. व्हिडिओमध्ये काही वेळासाठी सपना आणि वीरदेखील आपल्या मुलासह दिसत आहेत.
(हे वाचा:अभिनेत्री Yami Gautam ला आहे हा गंभीर आजार; फोटो शेअर करत स्वतः केला खुलासा)
'पोरस' या नावाला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. पौरस हा भारतात होऊन गेलेला अतिशय पराक्रमी राजा आहे. इसवी सनपूर्व काळात झेलम आणि चिनाब नदीच्या प्रदेशात पौरस राज्य करत होता. जगज्जेत्या सिकंदरानं जेव्हा भारतावर आक्रमण केलं होतं तेव्हा राजा पौरसनं मोठ्या धैर्यानं त्याला तोंड दिलं होतं. त्याच राजा पौरसच्या भूमीत सपना चौधरीचा मुलगा जन्मला आहे. याच कारणामुळे मुलाचं नाव पोरस ठेवल्याचं वीर साहू या व्हिडिओत सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss, Entertainment