डान्सर-सिंगर ते राजकारण, 'असा' आहे सपना चौधरीचा आतापर्यंतचा प्रवास

गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या सपनाचा डान्सर, सिंगर ते राजकारण हा प्रवास अजिबात सोप्पा नव्हता.

News18 Lokmat | Updated On: Jul 7, 2019 05:15 PM IST

डान्सर-सिंगर ते राजकारण, 'असा' आहे सपना चौधरीचा आतापर्यंतचा प्रवास

मुंबई, 7 जुलै : बोल्ड आणि बिनधास्त अंदाजामुळे सतत चर्चेत असणारी हरियाणाची सिंगर आणि डान्सर सपना चौधरीनं आज दिल्लीच्या जवाहरलाल स्टेडियम येथे भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकांच्या अगोदर सपना काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या मात्र त्यावेळी आपण कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करत नसल्याचं सपनानं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता सपनानं भजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे येत्या हरियाणा विधानसभा निवडनुकीत सपनाला तिकिट मिळू शकतं असं मानलं जात आहे. गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या सपनाचा डान्सर, सिंगर ते राजकारण हा प्रवास अजिबात सोप्पा नव्हता.

हरियाणाच्या रोहतकमध्ये 25 डिसेंबर 1990 ला सपनाचा जन्म झाला. आज सपना देशातील लोकप्रिय सिंगर आणि डान्सर आहे, पण तिचं बालपण खूप गरीबीत गेलं. वयाच्या 12 व्या वर्षीच सपनानं डान्स आणि सिंगिंगला तिचं करिअर बनवलं होतं जेणेकरून तिला तिच्या कुटुंबाचा खर्च उठवता येईल. असं म्हटलं जातं की मोठ्या बहीणीच्या लग्नाचा सर्व खर्च सुद्धा सपनानंच केला आहे.

BMC ला आता अक्षय कुमारचा आधार, मुंबईच्या समस्यावर निघणार तोडगा?

Loading...

 

View this post on Instagram

 

एक पल के लिए ही सही , किसी और के चेहरे की मुस्कान बनो। @pawanchawla2010 #smilepls #smile www.pawanchawla.co.in

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary) on

सपनानं एकदा आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. ही 2016 मधील घटना आहे. त्यावेळी 17 फेब्रुवारी 2016मध्ये सपनाच्या एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात तिनं ‘बिगडग्या’ हे गाणं गायलं होतं. ज्यामुळे ती वादात अडकली होती. या गाण्यातून सपनानं दलित समाजासाठी अपशब्द वापरल्याचा तिच्यावर आरोप आहे. त्यामुळे या गाण्यावर आक्षेप घेत बहुजन आझाद मोर्चानं तिच्या विरोधात तक्रार दाखल केली. पण हे प्रकरण पुढे अधिक वाढलं आणि सपनावर सोशल मीडियावरून खूप वाईट कमेंट यायला सुरूवात झाली. त्यामुळे सपनानं विष पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

VIDEO- विराटच्या चौकारावर अनुष्काने विचारले, ‘फोर का सिग्नल क्या होता है...’

आज सपना उत्तर भारतातील एक मोठी स्टार आहे. तसेच पंजाब हरियाणा आणि उत्तर प्रदेशात तिचे अनेक फॅन्स आहेत. 2018 मध्ये सपना चौधरी गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये तिसऱ्या स्थानावर होती. इन्स्टाग्रामवर तिचे 2 मिलियन चाहते आहेत. तसेच फेसबुकवर तिला 3 लाख 105 हजार 076 लोक फॉलो करतात. तिच्या कार्यक्रमांध्ये अनेकदा अनेक मोठ्या मोठ्या व्यक्ती भान विसरतात आणि मग त्यावरून नवे वाद सुरू होतात.

 

View this post on Instagram

 

I love black ........." #positivevibes #happiness #desiqueen #talent #loveyourself #thaknamanahai www.pawanchawla.co.in

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary) on

सपना चौधरी खूप बोल्ड आणि बिनधस्त आहे. सौंदर्याच्या बाबतीत ती कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. मात्र ती तिच्या खासगी जीवनाबाबत कोणासमोर उघडपणे बोलत नाही. म्हणजे लोकांना हे माहित नाही की, सपनाचा बॉयफ्रेंड आहे की नाही, किंवा ती विवाहीत आहे की नाही. सपना नेहमीच तिच्या खाजगी आयुष्याविषयी बोलणं टाळताना दिसते. ती बिग बॉस 11 ची स्पर्धकही राहिली आहे.

ग्लॅमरमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते श्वेता तिवारीची मुलगी, पाहा फोटो

आतापर्यंत फार कमी लोकांना सपनाच्या खऱ्या नावाविषयी माहिती आहे. सपनाचं खरं नावं सुष्मिता आहे. जे तिच्या काकीनं ठेवलं होतं मात्र तिच्या आईला हे नाव आवडत नसल्यांन तिनं शाळेत प्रवेश घेताना तिचं नाव बदलून सपना केलं. तर तिचं आडनाव चौधरी हे तिच्या चाहत्यानी दिलेलं आहे. तिचं खरं आडनाव अत्री आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अगोदर सपना काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं मात्र तिनं या सर्व चर्चा फक्त अफवा असल्याचं सांगत अद्याप माझा कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करण्याचा विचार नाही. तसेच मी कोणत्याही पक्षाचा प्रचारही करणार नसल्याचं सांगितलं होतं.

===============================================================

VIDEO: भाजपात प्रवेश करण्यासाठी विचार करण्याची गरज नाही- सपना चौधरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2019 05:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...