मुंबई, 17 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) नुकतीच अनुराग बासूच्या (Anurag Basu) (Ludo) लुडो या सिनेमामध्ये झळकली होती. या सिनेमात सान्याने पहिल्यांदाच आदित्य रॉय कपूरसोबत (Aditya Roy Kapoor) काम केलं आहे. सान्याने जेव्हा तिच्या मैत्रिणींना सांगितलं की मी, ‘आदित्य रॉय कपूरसोबत काम करणार आहे तेव्हा माझ्यापेक्षा त्याच जास्त खूश झाल्या होत्या.’ सान्याने सांगितलं की तिला ऑन स्क्रीन बोल्ड सीन द्यायला अवघड वाटतं.
लूडो या सिनेमामध्ये आदित्य आणि सान्याला काही बोल्ड सीन द्यायचे होते. सुरुवातीला सान्याला बोल्ड सीन देणं कठीण जात होतं. आजूबाजूला बरीच लोकं, कॅमेरे यामुळे ती फारच नर्व्हस झाली होती. असंही ती म्हणते. एका मुलाखतीदरम्यान सान्या म्हणाली होती, 'सिनेमाच्या आधी मी आदित्यला कपूरला ओळखत नव्हते. पण त्याच्यासोबत काम करायला मिळणार म्हणून मला खूप आनंद झाला होता. आदित्य एक चांगला अभिनेता आणि उत्तम माणूस आहे. त्याच्यासोबत बोल्ड सीन देताना सुरुवातीला खूप अवघड वाटत होतं. पण त्याने मला खूप कंफर्टेबल केलं. ’
आदित्य रॉय कपूर आणि सान्या मल्होत्रा लूडो या सिनेमामध्ये पहिल्यांदाच एकत्र झळकले आहेत. हा सिनेमा नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात आदित्य आणि सान्या यांची जोडी दाखवण्यात आली आहे. लग्नाआधीची त्यांची सेक्सक्लीप सोशल मीडियावर व्हायरल होते. आणि ही क्लीप सोशल मीडियावरुन काढून टाकण्याच्या मिशनसाठी ते दोघं एकत्र येतात असं दाखवण्यात आलं आहे.
लूडो या सिनेमामध्ये आदित्य रॉय कपूर आणि सान्या मल्होत्रासोबतच, पंकज त्रिपाठी, अभिषेक बच्चन, राजकुमार राव, फातिमा सना शेख, रोहित शराफ, आशा नेगी या कलाकारांनी काम केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood