Home /News /entertainment /

Santosh Juvekar: दत्तक पालक व्हा! संतोष जुवेकर का म्हणतोय असं? पोस्ट होतेय Viral!

Santosh Juvekar: दत्तक पालक व्हा! संतोष जुवेकर का म्हणतोय असं? पोस्ट होतेय Viral!

संतोष जुवेकर (Santosh Juvekar) या अभिनेत्याने केलेली एक पोस्ट सध्या अनेक चाहत्यांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

  मुंबई 5 जुलै: कलाकार कितीही कामात व्यस्त असले तरी त्यांच्या संवेदना कायमच जागरूक असतात. अगदी महामारी असो किंवा एखादी मदतीची हाक असो कलाकार कायमच सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभाग घेताना दिसतात. असंच एक भावनिक आवाहन सध्या संतोष जुवेकर (Santosh Juvekar) हा अभिनेता करताना दिसत आहे. संतोष कायमच अशा चांगल्या कार्याला पुढे घेऊन जायला मदत करताना दिसतो. सध्या त्याने सोशल मीडियावर (Santosh Juvekar Instagram) केलेली पोस्ट अनेकांकडून पसंत केली जात आहे. समाजात अशी अनेक मुलं आहेत ज्यांच्या खाण्यापिण्यापासून ते शिक्षणापर्यंत अनेक गरज भागवायला त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीत. अशा मुलांसाठी आज अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत. संतोष सुद्धा अशा मुलांसाठी आपण आपल्याकडून खारीचा वाटा उचलला पाहिजे असं म्हणत भावनिक करणारी एक पोस्ट शेअर करताना दिसतो आहे. तो पोस्टमध्ये असं  लिहितो,”घरच्यांना बरोबर मित्र मैत्रिणींन बरोबर बाहेर कधी नुसतं जेवायला गेलो तरी ६ ७ हजार bill सहज येत. मग जर फक्त १० हजारात जर आपण एखाद्या मुलाचं/मुलीचं वर्षाचं अन्न नक्कीच पुरवू शकतो. वर्षातन एखादी गोव्याची trip केली तरी २० २५ हजार सहज खर्च होतात आपले. मग फक्त १५ हजारात एखाद्या मुलाचा/मुलीचा वर्षभराचा शिक्षणाचा खर्च नक्कीच करून त्या मुलाचे/ मुलीचे दत्तक पालकत्व स्वीकारू शकतो आपण.😊 आणि हे सगळं ज्यांना मनापासून करावंसं वाटतं आणि जे आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत आणि ज्यांना कुठलीही अडचण नाही त्यांनी नक्कीच कराव पण मदत म्हणुन नाही तर कर्तव्य म्हणुन. आणि ही बळजबरी नाही. 🙏🙏🙏😊” हे ही वाचा-Aditi Sarangdhar: लेकाचा मोबाईवरचा स्क्रिन टाइम कमी करण्यासाठी अभिनेत्रीनं लढवली भन्नाट शक्कल
  केवळ मदतीच्या भावनेने नव्हे तर कर्तव्याच्या भावनेने एक आर्थिक दृष्ट्या सबळ असणारा माणूस म्हणून आणि एक नागरिक म्हणून आपण कर्त्यव्यदक्ष असलं पाहिजे असं संतोष या पोस्टमधून प्रेरित करताना दिसत आहे.
  संतोष इन्स्टाग्रामवर प्रचंड ऍक्टिव्ह असतो. त्याचे धमाल रील्स बघायला चाहत्यांना मजा येते. तसंच मागच्या काही काळात त्याने अनेक मराठी कलाकृतींबद्दल भरभरून कौतुक करून पाठिंबा सुद्धा दर्शवला होता. संतोष वर्क फ्रंटवर सध्या बराच ऍक्टिव्ह आहे. त्याची धारावी बँक ही वेबसिरीज लवकरच समोर येणार आहे तर त्याच्या एका सिनेमाचं नुकतंच शूटिंग सुद्धा संपल्याची पोस्ट त्याने शेअर केली होती.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Marathi entertainment

  पुढील बातम्या