मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Santosh Juvekar : 'जोश असुदे पण सोबतीला होशही असूदेत' संतोष जुवेकरने गोविंदा पथकांना केले आवाहन

Santosh Juvekar : 'जोश असुदे पण सोबतीला होशही असूदेत' संतोष जुवेकरने गोविंदा पथकांना केले आवाहन

santosh juvekar

santosh juvekar

दहीहंडी आली कि दरवर्षी वाद निर्माण होतोच होतो. काही जण दहीहंडी साजरी करताना उंचच उंच थर लावण्याला विरोध करतात. तर काही जणांचा हे सण आहेत तसे साजरे करण्याकडे कल असतो.आता अभिनेता संतोष जुवेकरने दहिहंडी साजरी करण्याबद्दल एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 17 ऑगस्ट : सध्या श्रावण सणांची सगळीकडे लगबग आहेत. सगळे सण मोठ्या उत्साहात साजरे  केले जातायत. मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांमध्ये देखील या सणांचा उत्साह पाहायला मिळतोय. कलाकारांनी  नुकतेच रक्षाबंधन साजरे केले. आता दोन दिवसांवर दहीहंडी हा सण येऊन ठेपला आहे. दहीहंडी आली कि दरवर्षी वाद निर्माण होतोच होतो. काही जण दहीहंडी साजरी करताना उंचच उंच थर लावण्याला विरोध करतात. तर काही जणांचा  हे सण आहेत तसे  साजरे करण्याकडे कल असतो. कलाकारही दहिहंडीबद्दल नेहमी मतं मांडताना दिसतात. आता  अभिनेता संतोष जुवेकरने दहिहंडी साजरी करण्याबद्दल एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याला चाहत्यांचा पाठींबा मिळतोय. संतोष जुवेकर हा अभिनेता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो त्याच्या आयुष्यातील प्रसंग, घडामोडी  चाहत्यांसोबत शेअर करत असतो.  तसेच तो विविध राजकीय विषयांवरही भाष्य करताना दिसून येतो. आता दहीहंडी जवळ आल्याच्या निमित्ताने या कलाकाराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याची चांगलीच चर्चा होत आहे. त्याने या पोस्टमध्ये दहीहंडी फोडण्यासाठी एकावर एक थर लावून उभे असलेल्या गोपाळांचा फोटो शेअर केला आहे. त्याने या पोस्टमध्ये लिहिलं आहे कि, '२ दिवसांन वर गोपाळ अष्टमी आलीये. गेली दोन वर्ष हा गोपाळ काला उत्सव साजरा करता नाही आला कारण covid च संकट तीव्र प्रमाणात होत पण ह्या वर्षी ह्या उत्सवाचा जोर आणि जोश काही औरच असणार आहे सगळेच गोपाळ आणि गोपिका दही हंडी फोडण्याची जोरात तयारी करतायत कस्सून सराव चालाय.'
  त्याने पुढे लिहिलंय कि, 'कालच माझे खूप जवळचे मित्र श्री मनोज चव्हाण दादानं मुळे महाराष्ट्रातल गाजलेल्या जय जवान गोविंदा पथक जोगेश्वरी (मुंबई ) ह्यांची practic बघण्याची संधी मिळाली क्या बात मित्रांनो आणि मैत्रिणींनो जोमात अहात सगळे तुम्ही. एक क्षण वाटलं आपण पण घुसावं पण इतकं सोप्प नाही ते लगेच जाणवलं.' हेही वाचा - Disha Vakani : 'तारक मेहता' पूर्वी दयाबेनने केलंय शाहरुख सोबत काम; तुम्हाला माहितेयत का दिशाच्या 'या' गोष्टी तसेच त्याने या गोविंदा पथकांना शुभेच्छा देत एक विनंती केली आहे. तो म्हणतोय कि, 'माझ्या तुम्हाला आणि सगळ्या गोविंदा पाथकांना खूप खूप शुभेच्छा आणि एक विनंती  मित्रांनो कृपया करून स्वतःची आणि तुमच्या सोबत येणाऱ्या मुलींची आणि लहान मुलांची काळजी घ्या दही हंडी हा सण आहे आपला तो सणा सारखाच साजरा करा त्याची स्पर्धा करू नका.' असे म्हणत तत्याने सगळ्या गोविंदांना 'मज्जा करा पण काळजी घ्या' असे  आहे. अशा शब्दात संतोष जुवेकरने दहिहंडीबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या संतोष जुवेकर त्याच्या नव्या सिनेमामुळे चर्चेत आहे. आलिया भट्ट, विजय वर्मा, शेफाली शाह आणि रोशन मॅथ्यूज यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या 'डार्लिंग्ज' सिनेमात संतोष जुवेकर एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला होता. त्याच्या या  सर्वत्र कौतुक झाले होते.
  Published by:Nishigandha Kshirsagar
  First published:

  Tags: Marathi entertainment

  पुढील बातम्या