मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Sanskruti Balgude: अभिनेत्रीच नव्हे तर उत्तम डान्सर आहे संस्कृती; नायिकेचा भरतनाट्यम व्हिडीओ पाहून भलेभले थक्क

Sanskruti Balgude: अभिनेत्रीच नव्हे तर उत्तम डान्सर आहे संस्कृती; नायिकेचा भरतनाट्यम व्हिडीओ पाहून भलेभले थक्क

Sanskruti Balgude

Sanskruti Balgude

संस्कृती बालगुडे सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. हटके फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांसोबत कनेक्ट राहते.

  • Published by:  Sayali Zarad
मुंबई, 19 ऑगस्ट : काल 'कृष्ण जन्माष्टमी' झाली आणि आज दहीहंडीचा उत्साह पहायला मिळतोय. कोरोनानंतर 2 वर्षांनी दहीहंडीचा जल्लोष आणि उत्साह राज्यभरात आहे. मागचे दोन वर्षे कोरोनाच्या उद्रेकामुळे सगळ्यांच सणांवर निर्बंध लावण्यात आले होते. यंदा मात्र सणांवरील निर्बंध हटवल्याने लोक सण साजरे करताना दिसत आहेत. अशातच अनेक कलाकार कृष्ण जन्माष्टमी आणि दहीदंडी स्पेशल पोस्ट शेअर करत आहेत. अनेकजण पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. अशातच अभिनेत्री संस्कृती बालगुडेनं (Sanskruti Balgude) स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. 'रे राया', 'लग्न मुबारक' यांसारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे. निखळ हास्यामुळे संस्कृतीने चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रियता मिळवली. यासोबतच संस्कृतीनं तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. कायम सोशल मीडियावर चर्चेत असणारी संस्कृती तिच्या नव्या व्हिडीओमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. संस्कृतीनं 'कृष्ण जन्माष्टमी' स्पेशल व्हिडीओ शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. हेही वाचा -  Pooja Sawant काय स्पेशल काम करतेय?; व्हिडीओ पाहून चाहत्यांनाही पडला प्रश्न 'कृष्ण जन्माष्टमी' स्पेशल संस्कृतीनं भरतनाट्यम करतानाचा एक जुना व्हिडीओ शेअर केलाय. कृष्ण जन्माष्टमीचं औचित्य साधत हा जुना व्हिडीओ पुन्हा शेअर करत असल्याचं संस्कृतीनं म्हटलं आहे. तिच्या या व्हिडीमधील हावभावांनी अनेकांचं मन जिंकलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
दरम्यान, संस्कृती सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. हटके फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांसोबत कनेक्ट राहते. संस्कृती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसते. नवनवीन आणि निरनिराळे फोटोशूट संस्कृती करत असते.
First published:

Tags: Instagram post, Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment

पुढील बातम्या