Home /News /entertainment /

Makar Sankranti: काळ्या पैठणीत सोनाली कुलकर्णीच्या नखरेल अदा, पाहा VIDEO

Makar Sankranti: काळ्या पैठणीत सोनाली कुलकर्णीच्या नखरेल अदा, पाहा VIDEO

Sonalee Kulkarni

Sonalee Kulkarni

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने संक्रांती निमित्त खास रील्स शेअर चाहत्यांना खास शुभेच्छा(Sankranti wishes from Sonalee Kulkarni) दिल्या आहेत.

  मुंबई, 14 जानेवारी: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni)विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते आता तिने संक्रांती निमित्त खास रील्स शेअर चाहत्यांना खास शुभेच्छा(Sankranti wishes from Sonalee Kulkarni) दिल्या आहेत. लग्नानंतर पहिल्यांदाच सोनाली मकर संक्रांत साजरी करत आहे. 'या संक्रांतीला नेसूनी पैठणी खेळूया झिम्मा' अशी कॅप्शन शेअर करत सोनालीने चाहत्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. तिने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिने काळ्या रंगाची पैठणी परिधान केली असल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच नव्हे तर तिने पैठणीवर ऑक्साईडची ज्वेलरी परिधान करत आपल्या सौंदर्यांमध्ये आणखी भर घातली आहे.
  नाकात नथ, हातात ऑक्साईडमध्ये कंडे, गळ्यात नेकलेस, कानात झुमके यासोबतच जिप्सीच्या फुलांना केसांची स्टाईल केली असल्याचे पाहायला मिळत आहे. सोनाली या लुकमध्ये खुपच सुंदर दिसत आहे, पोस्ट केलेल्या या रील्समध्ये सोनाली आपल्या कातील अदा दाखवताना दिसत आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करताना नुकतांच रिलीज झालेल्या झिम्मा या चित्रपटातील मुख्य गाण्याची जोड दिली आहे. सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती बऱ्याचदा फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. सोनाली कुलकर्णीचा मराठमोळा लूक चाहत्यांना भावतो. सोनाली कुलकर्णीचा पांडू चित्रपट नुकताच रिलीज झाला. तिने यामध्ये उषाची भूमिका साकारली आहे. याशिवाय सोनाली झिम्मा चित्रपटात झळकली आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment, Sonalee Kulkarni

  पुढील बातम्या