मुंबई, 27 मे : उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत. प्रत्येक जण आपआपला वेळ काढून सुट्ट्या एन्जॉय करतोय. अनेक कलाकार मंडळी देखील सुट्ट्यांसाठी आपल्या गावी गेलेत. गावी जाताना निवांत प्रवास झालेला सर्वांना आवडतो. आपली कार घेऊन जाणं नेहमीच सुरक्षीत आणि कम्फर्टेबल असतं. पण टेलिव्हिजनवरील एका प्रसिद्ध अभिनेत्याने स्वत:कडे कार आणि बुलेट असताना देखील साइकल राईड करत कोकणातलं घर गाठलंय. 151 किलो मीटरचा प्रवास त्यानं सोलो साइकलिंग करत केला आहे. त्यानं त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. आता लाख रुपयांची कार आणि बुलेट सारखी सुसाट बाईक असताना हा अभिनेता सायलिंग करत कोकणात का गेला बरा असा प्रश्न सर्वांना पडला असेल. काय आहे कारण पाहूयात.
151 किलो मीटरचा प्रवास करत कोकणात जाणाऱ्या अभिनेत्याचं नाव आहे संकेत कोर्लेकर. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा' या टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध मालिकेत संकेतनं काम केलं. त्याचप्रमाणे स्टार प्रवाहवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं', 'अजूनही बरसात आहे' सारख्या प्रसिद्ध मालिकेत त्यानं काम केलं आहे. तसंच 'टकाटक', 'आय पी एस' सारखे सिनेमे आणि 'शिवबा', 'मराठी पाऊल पडले पुढे' सारख्या मराठी नाटकातून संकेत प्रेक्षकांसमोर आला आहे. संकेत हा मुळचा कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या मुरड येथील आहे. त्याचे आई वडील गावीच असतात. संकेत कामानिमित्त मुंबईत राहतो.
हेही वाचा - मालिकेतील लेक कधी दाखवलीच नाही पण विशाखाच्या रिअल लाइफ लेकीला पाहिलं का? नुकतीच झालीये 12 वी पास
संकेतने मुंबई ते कोकण असा प्रवास सायकलने करण्याचा निर्णय घेतला. त्याने ठाण्याच्या गायमुख येथून प्रवास सुरू केला आणि 15 तासांनी तो मुरूडला पोहोचला. मे महिन्यातील रणरणत्या उन्हात त्यानं सायकलनं प्रवास केला. या मोठ्या सायकल राइडनंतर संकेत घरी पोहोचताच त्याच्या आईनं त्याची ओवाळून आरती केली आणि शाब्बासकीची थाप दिली. कारण त्याचा हा प्रवास म्हणजे त्याच्या आईचं बर्थ डे गिफ्ट होतं. त्याच्या आईचा 51वा वाढदिवस होता. यानिमित्तानं सायकल राइड करत आईला सरप्राइज गिफ्ट द्यायचं ठरवलं होतं.
इतक्या उन्हात एवढा मोठा प्रवास करून नको असा सल्ला अनेकांनी संकेतला दिला. मात्र आईला गिफ्ट देण्याचं भूत त्याच्या डोक्यात होतं त्यामुळे त्याने ते पूर्ण केलं. या प्रवासाठी त्याला सर्वांनी शुभेच्छा देखील दिल्या.
हेही वाचा - Guess Who : रील नाही हे आहे रिअल आयुष्यातलं लग्न; अभिनेत्रीला ओळखलं का?
संकेतनं लिहिलेल्या पोस्टमध्ये त्याने म्हटलंय, "मी माझ्या आईचा वाढदिवस विसरेन असं बापजन्मात कधी होणार नाही. पण तरीही आज माझ्या आईचा वाढदिवस आणि मला तो उभ्या आयुष्यात कधीच विसरायचा नाहीये म्हणून आज भर उन्हात मुंबई ते कोकण 151 किलोमीटर ते ही नॉन गिअर सायकल वर मी सायकल राईड केली.
संकेतनं पुढे लिहिलंय, "राईड सेफ करायची होती म्हणून ताकदीसोबत डोक्याचा वापर केला. उत्तम नियोजन केले आणि वाढदिवसाला आईला 151 किलोमीटर सायकल चालवून 1 मनसोक्त सेवा करण्यासाठी माझी तंदुरुस्त तब्येत तिला भेट दिली. एवढी मोठी सायकल राईड करताना मध्ये कितीही दमलो तरी राईड थांबवली नाही कारण उन्हाने मला हैराण करण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या सूर्याला काय माहित.मी माझ्या आईच्या पदराच्या सावलीत प्रवास करत होतो".
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi actress, Marathi entertainment, Marathi news, Marathi Serial