मुंबई, 25 मार्च- सध्याचं आयुष्य हे धावपळीचे झाले आहे. अशात वेळा पाळण्याच्या नादात बऱ्याच जणांचे आपल्या खाण्यापिण्याकडं दुर्लक्ष होत असते. पण आपल्या घरातील माणसं आपली काळजीपूर्वक काळजी घेताना दिसतात. त्यापैकी एक म्हणजे आपली आई. आईकधीच आपल्या मुलांना उपाशी पोटी घरातून बाहेर पाठवत नाही. कलाकारांना देखील शुटींगला कधी उशिरा तर कधी लवकर घरातून निघावं लागतं. मग आपल्या घरातील मंडळीच असते ती आपल्याला खाण्याचा आग्रह करताना दिसते, यामगं एकप्रकारची काळजी असते. अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांने देखील त्याच्या आईचा एक असाच किस्सा सांगितला आहे.
अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. सध्या संकर्षण त्याच्या नाटकाच्या दौऱ्यात व्यस्त आहे. अशावेळी त्याला नाटकाचे जसे प्रयोग असतात तसं घरातून बाहेर पडावं लागतं. त्यानं नुकतीच इन्साटवर एक पोस्ट केली आहे आणि सोबत मस्त असं जेवणाच्या ताटाचा फोटो पोस्ट केला आहे.
संकर्षण कऱ्हाडे आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, सुप्रभात .. मी तुम्हाला आज एक गंमत सांगतो..मी वयाच्या ७ व्या वर्षी पासून आजपर्यंत रोज सकाळी ८ः३० वा. जेवतो.. पोट्टभर.. माझे बाबा बॅंकेत होते.. आता रिटायर्ड झाले. ते बरोब्बर ८.४० ला घरातून निघायचे.. कध्धी त्यांची वेळ चूकली नाही.. आणि ८.३० ला पान वाढायची माझ्या आईची वेळ कधी चूकली नाही ..
वाचा-सोनू निगमच्या वडिलांच्या घरी चोरी करणारा अटकेत; कोल्हापूरातून जप्त केले 70 लाख
आजही शूट असेल , नसेल .. सकाळी लवकर जायचं असेल नसेल.. मला सकाळी ८.३० झाले कि पोटभर भूक लागते.. आणि मी पोटभर जेवतोच..आज आईने साधं वरण भात.. हिरव्या टोमॅटोची भरलेली भाजी.. वांग्याचं भरीत .. वाढलं.. अहो काय सांगु कसं वाटलं.. मनसोक्तं हानलं बघा .. माझ्या आईच्या हातचं काहीही अप्रतिमच लागतं..❤️ सहज शेअर करावं वाटलं.
वाचा-पद्मिनी कोल्हापुरेनं ऋषी कपूरच्या वाजवली 8 वेळा कानाखाली; लालबुंद झाला अभिनेता
संकर्षणाच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी देखील कमेंट केल्या आहेत. एकानं कमेंट करत आजची जेवणाची परस्थिती कशी आहे याबद्दल सांगितलं आहे. त्यानं म्हटलं आहे की, आपल्या कडे नाश्त्या ची पद्धत नव्हती पूर्वी… …सरळ जेवण … मग ४वाजता चहा च्या वेळेस भूक लागली की सुका नाश्ता… चकली किंवा शेव वगेरे…हल्ली pattern बदललं आहे तर दुसऱ्यानं म्हटलं आहे की,अरे वाह मस्तच..आणि तस पण आधी सुगीचे दिवस होते आता स्विगी चे आहेत त्यामुळे जेवण हे late मिळतं पण तुम्ही सुरू ठेवा. तर एकानं म्हटलं आहे की, आईच्या हातचं ते आईच्या हातचं..अशा असंख्य कमेंट त्याच्या या पोस्टवर आल्या आहेत.
View this post on Instagram
संकर्षण कऱ्हाडे हा सध्या त्याच्या नाटकांच्या दौऱ्यांमध्ये व्यस्त आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने संकर्षणला घराघरात लोकप्रिय केलं. या मालिकेनं आता प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. असं जरी असलं तरी आजही प्रेक्षक संकर्षँणाला छोच्या पडद्यावर मिस करताना दिसतात.
याशिवाय संकर्षण नाटकाचे प्रयोग, परदेशातील नाटकाचे दौरे यातून वेळ मिळाल्यानंतर संकर्षण सुंदर कविता सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याच्या कविता प्रचंड व्हायरल होतात. आता समीर या भूमिकेनंतर तो छोट्या पडद्यावर कोणत्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो त्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. शिवाय 'तू म्हणशील तसं' या नाटकाबरोबरच त्यांने लिहिलेलं आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'नियम व अटी लागू' हे नाटक देखील प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi entertainment