मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

sankarshan karhade : 'काल तर घाईघाईत असा घोट घेतला की...'; लंडनमध्ये संकर्षण नक्की करतोय काय?

sankarshan karhade : 'काल तर घाईघाईत असा घोट घेतला की...'; लंडनमध्ये संकर्षण नक्की करतोय काय?

संकर्षण कऱ्हाडे

संकर्षण कऱ्हाडे

लंडनमध्ये शुटींग करताना संकर्षण शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. लंडनच्या थंडीत संकर्षणची कशी वाट लागली याबद्दल त्यानं सांगितलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई,  27 सप्टेंबर: सध्या अनेक मराठी कलाकार लंडनमध्ये नव्या सिनेमाच्या शुटींगसाठी जात आहे. लंडनमध्ये मराठी कलाकारांची मांदियाळी भरली आहे असं म्हणायला हरकत नाही. सध्या अभिनेता संकर्षण कऱ्हाडे देखील नव्या सिनेमाच्या शुटींगसाठी लंडनमध्ये आहेत. त्याच्याबरोबर अभिनेत्री प्राजक्ता माळी, वैभव तत्त्ववादी देखील लंडनमध्ये आहेत. लंडनला गेल्यापासून संकर्षण तिथल्या अपडेट त्याच्या चाहत्यांना देत आहे. शुट दरम्यानची मज्जा मस्ती देखील तो शेअर करत आहे. नुकताच त्यानं त्याचा एक फोटो शेअर केला आहे. तो पाहून संकर्षण लंडनमध्ये कोणत्या परिस्थितीत शुट करावं लागलंय आणि काय काय सहन करावं लागतंय हे पाहायला मिळत आहे.

लंडनमध्ये सध्या प्रचंड थंडी आहे. तिथलं वातावरण आपल्यापेक्षा फार वेगळं आहे.  लंडनमध्ये 8 डिग्री सेल्सिअसमध्ये कलाकार शुटींग करत आहेत.  लंडनमधल्या थंडीत संकर्षणची चांगलीच वाट लागली आहे. थंडी घालवण्यासाठी सतत गरम जागेत बसावं लागत आहे किंवा काहीतरी गरम वस्तू खावी लागलेय. आता थंडीपासून वाचण्यासाठी एक उत्तम पर्याय म्हणजे कडक चहा. संकर्षण देखील चहावर थंडीचे दिवस भागवतोय. पण चहा पिणं सकर्षणला चांगलंच महागात पडलं आहे.

हेही वाचा - Sankarshan Karhade : अरेरे! लंडनला जाताच संकर्षणवर आले हे दिवस; अंगावरचं काढून...

संकर्षणनं चहा पिताना तो अनुभव शेअर केला आहे. संकर्षणनं पोस्टमध्ये लिहिलंय, 'लंडन च्या थंडीत , 8 डिग्री तापमानात, गाsssssssssssर वाऱ्यात गर्रमा गर्रम “चाय” पाजवणारे “ऊमेश भाई..” तुम्हाला काय सांगु त्याची किंमत ....?? काल तर घाईघाईत असा घोट घेतला. तोंड भाजलं. आता जिभेला चवच नाहीये. तुमचं झालंय का असं कधी ..????. हा गंमतीशीर किस्सा संकर्षणनं शेअर करताच अनेकांनी त्याला सहमती दिली आहे.

अभिनेते ऋषिकेश जोशी यांचं दिग्दर्शन असणारा नव्या कोऱ्या सिनेमाचं सध्या लंडनमध्ये शुटींग सुरू आहे ज्यात अभिनेता संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता माळी, वैभव तत्त्ववादी आणि अलोक राजवाडे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. कलाकार मंडळी सध्या लंडनमध्ये शुटींग करत धम्माल करत आहेत.  पण मात्र त्यांच्या सिनेमाचं नाव काही समोर आलेलं नाही.

सिनेमाचं नाव जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्साही आहेत.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment, Marathi news