Home /News /entertainment /

'माझी तुझी रेशीमगाठ', संकर्षण कऱ्हाडेनं श्रेयस तळपदेसाठी लिहिली खास पोस्ट

'माझी तुझी रेशीमगाठ', संकर्षण कऱ्हाडेनं श्रेयस तळपदेसाठी लिहिली खास पोस्ट

संकर्षण कऱ्हाडेने श्रेयस तळपदेसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

  मुंबई, 27 जानेवारी-  मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदेचा आज  (Shreyas Talapade)  46 वा वाढदिवस   (46th Birthday)  साजरा करत आहे.  श्रेयसने मराठीसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला आहे. सध्या श्रेयस तळपदे झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यशची भूमिका साकरताना दिसत आहे. यशची भूमिका सर्वांना आवडत आहे. विशेष म्हणजे या मालिकेत यश आणि समीरच्या मैत्रिची तितकीच चर्चा होती. सच्ची यारी काय असते..हेच या दोघांच्याकडे पाहायल्यानंतर लक्षात येते. समीरची भूमिका अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (sankarshan karhade ) साकारत आहे. जितकी या दोघांच्यात मैत्रि ऑनस्क्रीन जितकी घट्ट आहे तितकीच या दोघांच्यातील  मैत्रि ऑफस्क्रीन देखील तितकीच घट्ट आहे.
  संकर्षण कऱ्हाडेने श्रेयस तळपदेसाठी खास पोस्ट लिहिली आहे. त्याने पोस्ट म्हटले आहे की, तू खरंच खूप चांगला आहेस.. माझं तुझ्यावर खरंच खूप मनापासून निस्वार्थी प्रेम आहे.. माझ्या मनात तुझ्याविषयी नितांत आदर आहे ..” आणि हे सगळं तू तूझ्या वागण्यातूनच मला वाटायला भाग पाडलं आहेस..आजवर एक अनुभवी , यशस्वी अभिनेता म्हणुन तू माझ्यावर कधीही , एकदाही , वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्नं केला नाहीस.. तु तुझ्या असण्याचं , वलयाचं माझ्यावर कधिही दडपण आणलं नाहीस.. माझं कौतुकच केलंस आणि मुख्य म्हणजे माझ्या माघारी लोकांनी केलेलं माझं कौतुक मला येउन सांगीतलंस. तुझं मन खरंच खूप मोठं आहे. स्वत:च्या कामाविषयी आत्मविश्वास असलेले लोक ईतरांची निंदा करण्यात वेळ घालवत नाहीत असं म्हणतात..
  तसा तू आहेस. तुझ्यासोबतच्या ह्या ७ महिन्यांच्या काळात मी तुला कुणाची निंदा करतांना ऐकलं नाही.म्हणुनच .. माझ्या आयुष्यात आजवर जे जे जेष्ठं किंवा अनुभवी कलाकार आले ज्यांनी मला प्रेमानेच वागवलं आणि माझ्या मनांत आयुष्यभराची आदराची जागा मिळवली त्यांच्या पंक्तीत तू आहेस आणि कायम राहाशील.
  शिवाय समीर म्हणुन मी काम केल्याने माझ्या लोकप्रियतेत , लोकांच्या माझ्यावरच्या प्रेमात जी भर पडलीये आणि त्यामुळे मला जे जे काही म्हणुन मिळतंय त्याचं सगळं श्रेय श्रेयस दादाचंच आहे. निर्वीवाद..दादा तुला शुभेच्छा अशा देतो कि , तुला हवं ते सगळं मिळु दे .. तुझ्या इथुन पुढच्या सगळ्या कलाकृतींना घवघवीत यश मिळु दे.. तुझ्या कलाकृतींना भाषेचं बंधन नं राहाता तु सगळ्या जगांत लोकप्रियता मिळव..एक नवरा म्हणुन सुख , बाप म्हणुन अभिमान , कलाकार म्हणुन यश , आणि माणुस म्हणुन समाधान तुला आयुष्यंभर मिळत राहावं हीच देवाला प्रार्थना..
  संकर्षणच्या या पोस्टनंतर चाहत्यांकडून या दोघांच्या मैत्रिच कौतुक करत आहेत व श्रेयसवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या