मुंबई, 28 जून : राजकुमार हिरानी दिग्दर्शित आणि बहुप्रतीक्षित 'संजू' हा सिनेमा अखेर शुक्रवारी प्रदर्शित होतोय. संजय दत्तचा बायोपिक असलेल्या या सिनेमात रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका साकारलीय. त्यामुळे संजय दत्तचे चाहते आणि रणबीर कपूरचे चाहते असलेल्या सर्वांनाच सिनेमाची उत्सुकता आहे.
संजय दत्तचा बॉलिवूडमध्ये प्रवेश, त्यानंतर त्याचं ड्रग्जच्या आहारी जाणं, आणि मुख्य म्हणजे 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात आर्म्स अॅक्ट अंतर्गत त्याने भोगलेली शिक्षा या सगळ्याचा आलेख या सिनेमात दिसणार आहे. राजकुमार हिरानी याचं दिग्दर्शन आणि विधू विनोद चोप्रा यांची निर्मिती असलेल्या संजू सिनेमाचं अॅडव्हान्स बुकिंग रविवारपासून सुरु झालं होतं. भारतभरात तब्बल चार हजार स्क्रिन्समध्ये हा सिनेमा प्रदर्शित झालाय.
या सिनेमात रणबीर कपूरसोबत मनीषा कोईराला, दिया मिर्झा, अनुष्का शर्मा, सोनम कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. संजू झालेल्या रणबीर कपूरचं नशीब यंदा उजळणार का, आणि बॉक्स ऑफीसवर संजू किती कमावणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Film release, Ranbir kapoor, Sanjay dutt, Sanju