'संजू'नं तोडला 'बाहुबली 2'चा रेकाॅर्ड, आता भिडणार 'दंगल'ला!

सिनेमानं चौथ्या दिवशी 145 कोटींचा आकडा पार करत बाहुबली 2चं रेकाॅर्ड ब्रेक केलंय. आणि आता पीके, दंगल या सिनेमांचं रेकाॅर्ड तोडण्याकडे सिनेमाची घोडदौड सुरू आहे.

सिनेमानं चौथ्या दिवशी 145 कोटींचा आकडा पार करत बाहुबली 2चं रेकाॅर्ड ब्रेक केलंय. आणि आता पीके, दंगल या सिनेमांचं रेकाॅर्ड तोडण्याकडे सिनेमाची घोडदौड सुरू आहे.

  • Share this:
मुंबई, 03 जुलै : 'संजू' सिनेमानं बाॅक्स आॅफिसवर अक्षरश: धूम माजवलीय. सिनेमानं चौथ्या दिवशी 145 कोटींचा आकडा पार करत बाहुबली 2चं रेकाॅर्ड ब्रेक केलंय. आणि आता पीके, दंगल या सिनेमांचं रेकाॅर्ड तोडण्याकडे सिनेमाची घोडदौड सुरू आहे. हेही वाचा

'संजू'च्या सेलिब्रेशनला कोण कोण आलं होतं?

रेणुका शहाणेला मुंबईची काळजी पण लोकांनी म्हटलं 'काँग्रेसवाली', ट्विटरवर ट्रोल

'बिग बॉस म्हणजे वेड्यांचा बाजार'

'बाहुबली 2'चा रेकाॅर्ड कोणी तोडणार नाही, असा अंदाज ट्रेड गाईड्सनी व्यक्त केला होता. पण संजूनं तो खोटा ठरवला. वीकेण्डला 'संजू'नं  120 कोटींचा गल्ला गोळा केला होता. संजूनं रेस 3, पद्मावत सगळ्यांनाच मागे टाकलंय. त्यात संजय दत्तचा बॉलिवूडमध्ये प्रवेश, त्यानंतर त्याचं ड्रग्जच्या आहारी जाणं, आणि मुख्य म्हणजे 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात आर्म्स अॅक्ट अंतर्गत त्याने भोगलेली शिक्षा या सगळ्याचा आलेख या सिनेमात पहायला मिळतोय. या सिनेमात रणबीर कपूरसोबत मनीषा कोईराला, दिया मिर्झा, अनुष्का शर्मा, सोनम कपूर यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. संजू झालेल्या रणबीर कपूरला बाॅक्स आॅफिसवर बऱ्याच दिवसांनी यश पाहायला मिळतंय.
First published: