... म्हणून संघाच्या मुखपत्राने राजकुमार हिरानींना फटकारले

... म्हणून संघाच्या मुखपत्राने राजकुमार हिरानींना फटकारले

या सिनेमातून गुन्हेगाराचे समर्थन करण्यात आले आहे

  • Share this:

मुंबई, 12 जुलैः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'पाञ्चजन्य' या मुखपत्रात 'संजू' सिनेमावर टीका केली आहे. बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर हा सिनेमा आधारित आहे. सिनेमाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. सिनेमात हिरानी यांचे उद्दीष्ट संजय दत्तची प्रतिमा स्वच्छ दाखवण्याचा होता का? असा प्रश्न मुखपत्रात विचारण्यात आला आहे. या सिनेमातून गुन्हेगाराचे समर्थन करण्यात आले आहे. ज्या व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तीला स्टार कसे करु शकता असा सवाल या लेखात उपस्थित करण्यात आला. एकीकडे संजय दत्तची प्रतिमा चांगली करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले जात आहे तर दुसरीकडे मात्र अनेकांना हा सिनेमा आवडतही आहे.

29 मे रोजी संजू हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका साकारली होती. या सिनेमाला संमिश्र प्रतिसाद येत असला तरी बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने दमदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने 284 कोटींचा गल्ला कमावला असून अजूनही अनेक चित्रपटगृहात हा सिनेमा हाऊसफुल्ल ठरत आहे. रणबीर कपूरसोबतच परेश रावल, मनिषा कोईराला, विक्की कौशल, दिया मिर्झा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.

हेही वाचाः

आज ठाण्यात रिक्षा चालकांचं धरणे आंदोलन, या आहेत मागण्या

वडिलांनी दिलेल्या केमिकलमुळे मायकल जॅक्सन झाला होता नपुंसक, डॉक्टरांचा नवा खुलासा

पाकने केला पहिल्या शिख पोलीस अधिकाऱ्याचा अपमान, पगडी हिसकावली

First published: July 12, 2018, 2:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading