मृत्यूपूर्वी सुनील दत्त यांनी लिहिलं होतं परेश रावल यांना पत्र

मृत्यूपूर्वी सुनील दत्त यांनी लिहिलं होतं परेश रावल यांना पत्र

परेश रावल आणि सुनील दत्त यांच्यातही काही बंध होते. मृत्यूपूर्वी सुनील दत्त यांनी परेश रावलना पत्र लिहिलं होतं.

  • Share this:

मुंबई, १० जुलै : 'संजू' सिनेमा सुपरडुपर हिट झाला. यातलं बाप-लेकाचं बाँडिंगही अधोरेखित झालं.  संजय दत्तची भूमिका करणाऱ्या रणबीरचं जसं कौतुक झालं, तशी सुनील दत्त यांची भूमिका करणाऱ्या परेश रावल यांनीही वाहवा मिळवली. पण परेश रावल आणि सुनील दत्त यांच्यातही काही बंध होते. मृत्यूपूर्वी सुनील दत्त यांनी परेश रावलना पत्र लिहिलं होतं.

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना परेश रावल म्हणाले, सुनील दत्त यांनी मृत्यूपूर्वी मला पत्र लिहिलं होतं. माझ्या वाढदिवसाच्या आधी पाच दिवस मिळालं होतं. त्याच दिवशी दत्तसाहेबांचं निधन झालं. आणि जानेवारी २०१७ला मला त्यांचीच भूमिका आॅफर झाली.

परेश रावल म्हणाले, ' २५ मे रोजी आमचं शूटिंग सुरू होतं. त्याचवेळी दत्तसाहेब गेल्याची बातमी आली. मी ती सांगायला घरी फोन केला. तेव्हा कळलं घरी त्यांचंच पत्र आलंय. तेही मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला. तेव्हा मी बायकोला म्हणालो माझा वाढदिवस तर ३० मे रोजी आहे. म्हणजे त्यांनी आगाऊ शुभेच्छा दिल्या. जणू ते ३० तारखेला या जगात नाहीत, हे त्यांना कळलं होतं.'

First published: July 10, 2018, 4:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading