Home /News /entertainment /

आमिर अली -संजीदा शेखनं लग्नाच्या 9 वर्षानंतर घेतला घटस्फोट, मुलीची कस्टडी आईकडे

आमिर अली -संजीदा शेखनं लग्नाच्या 9 वर्षानंतर घेतला घटस्फोट, मुलीची कस्टडी आईकडे

लोकप्रिय टीव्ही कलाकार आमिर अली आणि संजीदा शेख (Sanjeeda Shaikh Aamir Ali Divorce) यांचा घटस्फोट झाला आहे.

    मुंबई, 6 जानेवारी- लोकप्रिय टीव्ही कलाकार आमिर अली आणि संजीदा शेख (Sanjeeda Shaikh Aamir Ali Divorce) यांचा घटस्फोट झाला आहे. बऱ्याच दिवसांपासून दोघांच्या नात्याबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात होते. मात्र यावर आमिर किंवा संजीदा यांनी कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही. असे म्हटले जात आहे की, संजीदा आणि आमिर विभक्त होण्याची अधिकृत घोषणा देखील करणार नाहीत. मात्र या दोघांच्या जवळच्या सूत्राने याबाबत माहिती दिली आहे. हिंदुस्तान लाइव्हच्या बातमीनुसार, एका सूत्राने दिलेलया माहितीनुसार, घटस्फोटाची कागदपत्रे येऊन जवळपास नऊ महिने झाले आहेत. दोघेही आयुष्यात खूप पुढे गेले आहेत. दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल अत्यंत गोपिनियता बाळगली आहे. त्यामुळेच दोघेही घटस्फोटाबद्दल अधिकृत वक्तव्य करणं टाळत आहेत. संजीदाकडे आहे मुलीची कस्टडी आमिर अली आणि संजीदा शेख (Aamir Ali Sanjeeda Shaikh) यांना दोन वर्षांची मुलगी आहे. मुलीचे नाव आयरा आहे. घटस्फोटानंतर मुलीची कस्टडी संजीदाकडे आहे. दोघांशी संपर्क साधला असता, त्यांनी घटस्फोटाच्या वृत्ताला नकारही दिला नाही किंव त्याची पुष्टीही दिली नाही. मात्र, घटस्फोटाच्या प्रकरणावर मला भाष्य करायचे नसल्याचे संजीदा म्हणाली. वाचा-असं बर्थडे गिफ्ट कधीच कुणी दिलं नसेल! शाल्मलीच्या नवऱ्याने काय दिलं पाहा.... संजीदाला मुलगीला पाहायचे आहे आनंदात संजीदा शेखने आपल्या मुलीबाबत म्हणाली का, मला फक्त माझ्या मुलीला आनंदी पाहायचे आहे. दुसरीकडेआमिर अली म्हणाला की, संजीदाला खूप आनंद मिळो. वाचा-आमिरनं कतरिनासमोर ठेवली होती मोठी अट, घाबरली होती अभिनेत्री 2012 मध्ये झाले होते लग्न आमिर अली आणि संजीदा शेख यांनी एकमेकांना डेट केल्यानंतर 2012 मध्ये लग्न केले होते. 2020 मध्ये त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. दोघे वेगळे राहत असल्याचे बोलले जात होते. त्या अफवांच्या चर्चेत हे देखील उघड झाले की, या दोघांना चार महिन्यांचे सरोगेट बाळ आहे. दोघांनी एकत्र टीव्हीच्या लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो 'नच बलिये 8' मध्ये भाग घेतला होता.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment, Tv actress

    पुढील बातम्या