'संजयजी तुम्ही महाराष्ट्र नाही; मला अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे', कंगनाची तुफान फटकेबाजी, पाहा VIDEO

'संजयजी तुम्ही महाराष्ट्र नाही; मला अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे', कंगनाची तुफान फटकेबाजी, पाहा VIDEO

'संजयजी या देशाची मुलगी तुम्हाला माफ करणार नाही...' कंगनाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 6 सप्टेंबर : अभिनेत्री कंगना रणौत हिने मुंबई पोलिसांवर टीका केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाला मुंबईत न येण्याचा सल्ला दिला होता, त्याशिवाय जर कंगना मुंबईत आली तर तिचा शिवसेना स्टाइल समाचार घेण्यात येईल, असा दावा केला होता. त्यानंतरही कंगनाने ट्विटरवर राऊतांना आव्हान दिलं आहे.

मी 9 सप्टेंबरला मुंबईत येणार आहे, त्यामुळे कोणाच्या बापाची हिंमत असले तर मला अडवून दाखवा, असं खुलं चॅलेंज तिने दिलं होतं. त्यानंतर आज कंगनाने एक व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये तिने संजय राऊतांवर खरमरीत टीका केली आहे.

या व्हिडीओमध्ये ती म्हणते, की यापूर्वी अमिर खान आणि नसरुद्दीन शहा यांनी येथे राहायला असुरक्षित वाटत असल्याचं वक्तव्य केलं होतं. तेव्हा त्यांना कोणीच हरामखोर म्हटलं नाही..मात्र मला तुम्ही मारण्याची धमकी देत आहात..देशात दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत, त्यांचे अतोनात हाल होत आहेत..यामागे छोटी मानसिकता कारणीभूत आहे..तुमच्या वागणुकीचा मी निषेध करते..यापूर्वी मी मुंबई पोलिसांच्या कामाचं कौतुक केलं आहे..मात्र पालघर लिचिंग प्रकरणात आणि सुशांतच्या मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांनी योग्य प्रकारे काम केलं नाही, हे दिसत आहे. त्यामुळे मी बोलणार...संजयजी मला अभिव्यक्त होण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. मला माझ्या देशात कुठेही जाण्या-येण्याचं स्वातंत्र्य आहे..तुम्ही महाराष्ट्र नाही..त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी महाराष्ट्राची निंदा केली. दुसरी गोष्ट मला देशात कोठेही राहण्याचं स्वातंत्र्य आहे. या 9 तारखेला भेटूया असंही तिने या व्हिडीओच्या शेवटी म्हटलं आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: September 6, 2020, 3:46 PM IST

ताज्या बातम्या