मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'आम्हाला सुशांतच्या कुटुंबीयांइतकीच काळजी पण...', SSR प्रकरणात संजय राऊतांचा यू-टर्न

'आम्हाला सुशांतच्या कुटुंबीयांइतकीच काळजी पण...', SSR प्रकरणात संजय राऊतांचा यू-टर्न

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांइतकीच या प्रकरणाची काळजी आम्हाला आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. याआधी त्यांनीच सुशांतच्या कुटुंबीयांवर टीका केली होती.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांइतकीच या प्रकरणाची काळजी आम्हाला आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. याआधी त्यांनीच सुशांतच्या कुटुंबीयांवर टीका केली होती.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांइतकीच या प्रकरणाची काळजी आम्हाला आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. याआधी त्यांनीच सुशांतच्या कुटुंबीयांवर टीका केली होती.

  • Published by:  Janhavi Bhatkar
मुंबई, 14 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू (Sushant Singh Rajput Death) प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस योग्य पद्धतीने करत असून, हा तपास सीबीआयकडे देण्याची आवश्यकता नाही ही भूमिका  शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वेळोवेळी मांडली आहे. दरम्यान त्यांनी या वादात सुशांतच्या वडिलांवर आरोप करून उडी घेतली होती. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरामध्ये संजय राऊत यांनी सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांबद्दल अजब दावा केला होता. त्यानंतर राजपूत कुटुंबीयांनी त्यांचा दावा खोडून काढला होता. या प्रकाराबाबत आता संजय राऊत यांनी घुमजाव केला आहे. आम्हाला सुशांतच्या कुटुंबीयांइतकीच या प्रकरणाची काळजी आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली आहे. ते म्हणाले की, 'मी असे म्हटले होते की सुशांतच्या कुटुंबीयांनी धीर धरणे आवश्यक आहे. पण कुणीतरी असे म्हणाले आहे की मी त्याच्या कुटुंबीयांना धमकावत आहे. हे धमकी कशी होऊ शकते? तुम्ही माझ्या बोलण्याचा असा चुकीचा अर्थ कसा काय लावू शकता? आम्हाला सुशांतच्या कुटुंबीयांइतकीच या प्रकरणाची काळजी आहे.' (हे वाचा-#CBIforSSR: सुशांतच्या बहिणीपाठोपाठ या बॉलिवूड कलाकारांनी केली CBI चौकशीची मागणी) गुरुवारी माध्यमांशी बोलताना राऊत यांनी सुशांतच्या कुटुंबीयांनी धैर्य ठेवावे आणि मुंबई पोलिसांना त्यांचे काम करू द्यावे अशी विनंती केली आहे. ते असे म्हणाले की, 'सुशांतला न्याय मिळवून देणे अंतिम ध्येय आहे. मी (सुशांतच्या) कुटुंबीयांना आणि इतरांना काही काळासाठी शांत राहण्याची आणि मुंबई पोलिसांना शांतपणे या प्रकरणाचा तपास करू देण्याची विनंती करतो. पोलीस चौकशीत सर्वांनी सहकार्य करावे.' काय म्हणाले होते राऊत? 'सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बिहार सरकारला तसे पडायचे कारण नव्हते.  सुशांतचे कुटुंब म्हणजे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले नव्हते. याच वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एक ‘एफआयआर’ दाखल करायला लावला गेला व मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलीस मुंबईला आले.' (हे वाचा-सुशांतला मारण्यासाठी स्टनगनचा वापर? डॉक्टरच्या दाव्याने खळबळ) दरम्यान सुशांतच्या मामाने संजय राऊतांचा हा दावा खोडून काढला होता. 'खासदार संजय राऊत यांनी आमच्या कुटुंबीयावर चुकीचे आरोप केले आहे. त्यांचे हे वक्तव्य प्रतिमा मलिन करणार आहे. कोणतीही माहिती न घेता उगाच आरोप करून एखाद्याच्या प्रतिमेवर बोट ठेवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?' असा सवाल सिंग यांनी थेट राऊतांना विचारला. तसंच, सुशांत आणि त्याच्या वडिलांमध्ये पटत नसले तरीही त्याच्या वडिलांनी कोणतेही दुसरे लग्न केले नाही. हे बिहारमध्ये राहत असणाऱ्या सर्व लोकांना माहिती आहे, असा खुलासाही सिंग यांनी केला. तर दुसरीकडे सुशांतचे चुलत भाऊ आणि बिहार भाजपचे आमदार नीरज सिंह बब्लू यांनी संजय राऊत यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे.
First published:

Tags: Sanjay Raut (Politician), Sushant Singh Rajput

पुढील बातम्या