मराठी सिनेनिर्मात्यांची अवस्था फेरीवाल्यांसारखीच-संजय राऊत; 'देवा' वादात शिवसेनेची उडी

आता या वादात शिवसेना आणि नितेश राणेंनीही उडी घेतली आहे. मराठी चित्रपटांना सिनेमा मिळालाच पाहिजे असं म्हटलं आहे

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 20, 2017 12:31 PM IST

मराठी  सिनेनिर्मात्यांची अवस्था  फेरीवाल्यांसारखीच-संजय राऊत; 'देवा' वादात शिवसेनेची उडी

 20डिसेंबर:   देवा- टायगर झिंदा हैच्या वादात   शिवसेनेनेही उडी घेतली आहे. मराठी निर्मात्यांची अवस्थाही फेरीवाल्यांसारखी झाली आहे असं ट्विट शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केलं आहे.

हे दोन्ही चित्रपट येत्या २२ तारखेला प्रदर्शित होणार आहेत. पण यशराज फिल्म्सचा आक्रमकपणा असा, की बहुतांश स्क्रीन्स 'टायगर जिंदा है'साठी आरक्षित झालेत. यावर काँग्रेस नेते नितेश राणे यांंनीही टीका केली आहे.  यामुळे मराठी चित्रपट देवाला चित्रपटगृहच मिळत नाहीत. मल्टिप्लेक्समध्ये ही समस्या आहेच, पण खुद्द प्लाझा, चित्रा आणि स्टारसिटीमध्येही देवाला शोज मिळत नाहीयेत. यामध्ये आता मनसेनंही उडी घेतली होती. देवा या चित्रपटाला स्थान द्या, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीनं ती मिळवून देऊ, अशं धमकीवजा पत्रच मनसे चित्रपट सेनेनं काढलं होतं .

आता  या  वादात शिवसेना आणि नितेश राणेंनीही उडी घेतली आहे. मराठी चित्रपटांना सिनेमा मिळालाच पाहिजे असं म्हटलं आहे तर देवाला मारून कुठलाच टायगर झिंदा राहणार नाही असं नितेश राणेंनी म्हटलं होतं. या आधी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कासव सिनेमालाही एकच थिएटर मिळण्याची नामुष्की आली होती.

तर या वादात मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपमही उतरले आहेत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 20, 2017 12:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...