Home /News /entertainment /

‘छिछोरे’नंतर सुशांतकडून का काढून घेतले गेले 7 सिनेमे? संजय निरूपम यांचा बॉलिवूडला सवाल

‘छिछोरे’नंतर सुशांतकडून का काढून घेतले गेले 7 सिनेमे? संजय निरूपम यांचा बॉलिवूडला सवाल

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडची ही धक्कादायक बाजू पुन्हा एकदा समोर आली आहे.

    मुंबई, 15 जून : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं मुंबईत राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. वयाच्या 34 व्या वर्षीच जगाचा असा अचानक निरोप घेणाऱ्या सुशांत जाणं सर्वांच्या मनाला चटका लावून गेलं. त्याच्या निधनानंतर बॉलिवूडला धक्का बसाल आहे. सुशांतला श्रद्धांजली वाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी ते ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर पर्यंत सर्वांनीच ट्वीट केले. अशातच सुशांतच्या आत्महत्येनंतर काँग्रेस नेता संजय निरूपम यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीवर प्रश्न उपस्थित केला आहे. काँग्रेस नेता संजय निरूपम यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘छिछोरे हिट झाल्यानंतर सुशांतनं 7 सिनेमा साइन केले होते. पण पुढच्या सहा महिन्यातच त्याच्या हातातून हे सिनेमे निघून गेले. का? फिल्म इंडस्ट्रीमधील निष्ठुरता एका वेगळ्याच पातळीवर काम करते आणि याच निष्ठुरतेनं आज एका उमद्या कलाकारचा जीव घेतला आहे. सुशांतला विनम्र श्रद्धांजली!’ सुशांतच्या निधनानंतर आता बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकांनी याविषयी ट्वीट केले आहेत. अभिनेता सोनू सूदनं लिहिलं, मला खरंच धक्का बसला. माझं हृदय तुटलं आहे. भावा माझ्याकडे शब्द नाहीत. किती चांगलं झालं असतं जर हे वृत्तच खोटं असतं. सोनू सूदनं सुशांतचा एक फोटो शेअर करत लिहिलं, हे तू ठिक केलं नाही. तुला इथे बराच काळ राहायचं होतं. अभिनेता अक्षय कुमारनं सुद्धा सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे. त्यानं लिहिलं, खरं सांगू तर मी हे जेव्हा ऐकलं तेव्हा स्तब्ध झालो... मला आठवतं मी ‘छिछोरे’मध्ये जेव्हा सुशांतला पाहिलं होतं तेव्हा माझा मित्र साजिदला सांगितलं होतं की, मी हा सिनेमा किती एन्जॉय केलं. या सिनेमाचा भाग होणं मला आवडलं असतं. सुशांत खूपच प्रतिभाशाली अभिनेता होता. देव त्याच्या कुटुंबाला शक्ती देवो. सुशांतनं 'काय पो छे' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमानं लोकप्रियतेच्या एका वेगळ्याच शिखरावर नेऊन ठेवलं होतं. अगदी अलिकडच्याच काळात रिलीज झालेला त्याचा 'छिछोरे' हा सिनेमा सुद्धा बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता. या सिनेमात आत्महत्या करण हा अखेरचा उपाय नाही असा संदेश देणाऱ्या सुशांतनं स्वतः मात्र तेच टोकाचं पाऊल उचललं. सुशांतचा 'तो' फोटो पोस्ट करत असाल तर सावधान! होऊ शकते कारवाई सुशांतच्या सिनेमातील अभिनेत्रीला कोसळलं रडू, प्रदर्शनाआधीच घेतला जगाचा निरोप
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Bollywood, Sanjay Nirupam (Politician), Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या