मुंबई 13 जुलै: संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) हा मराठी मनोरंजनसृष्टीतील एक नामांकित अभिनेते म्हणून ओळखले जातात. नाटक आणि चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारणारे संजय जवळपास गेली तीन दशकं सातत्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. (Sanjay Narvekar Movie) त्यांच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. ते लवकर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहेत.
आलिया-रणबीरचा 2037 मध्ये होणार घटस्फोट; अभिनेत्याची वादग्रस्त भविष्यवाणी चर्चेत
स्टार प्रवाहवरील ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ (Tuzya Ishkacha Nadkhula) या मालिकेतून ते छोट्या पडद्यावर दमदार एण्ट्री मारणार आहे. सध्या ही मालिका प्रचंड चर्चेत असते. सातत्याने यामध्ये विविध प्रकारचे ट्विस्ट येताना दिसत आहेत. त्यातच आता संजय नार्वेकरांची देखील एण्ट्री होणार त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा आणखी वाढली आहे. ते या मालिकेत इन्सपेक्टर गौतम साळवी ही दमदार भूमिका साकारणार आहेत.
‘राजकीय नाटकं चालतात पण आमची नाही’; केदार शिंदेंचा राज्य सरकारला टोला
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत संजय नार्वेकरांनी मालिकेतील आपल्या भूमिकेवर भाष्य केलं. ते म्हणाले, “नाटक आणि चित्रपटांमध्ये यापूर्वी प्रेक्षकांनी मला पाहिलं आहे. मालिकेसाठी बराच वेळ द्यावा लागतो. चित्रपट आणि नाटक सुरु असल्यामुळे मला तो वेळ मालिकेसाठी देता आला नाही. मात्र आता सुवर्णयोग जुळून आलाय. व्यक्तिरेखा खूप छान आहे आणि वेळेचं गणितही जमून आलं आहे. कोणतंही पात्र साकारताना त्याला वेळ आणि योग्य न्याय देता आला पाहिजे असं मला वाटतं. इन्सपेक्टर गौतम साळवी हा एक डॅशिंग, जबाबदार आणि प्रामाणिक पोलिस अधिकारी आहे. पोलीस डिपार्टमेंटमध्ये त्याची जबर चर्चा आहे. मिश्किल आणि जिंदादील स्वभावाचा असा हा प्रामाणिक पोलिस अधिकारी. माझ्या पद्धतीने मी या पात्रात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न करतो आहे.”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Tv actor, TV serials