संजय मोने म्हणतायत 'कानाला खडा'!

संजय मोने म्हणतायत 'कानाला खडा'!

या चॅट शोमध्ये कलाकारांशी गप्पा मारण्यासाठी आणि त्यांची टेर खेचण्यासाठी एखादं मिश्किल व्यक्तिमत्त्वच सूत्रसंचालकाच्या भूमिकेत असलं पाहिजे आणि म्हणूनच या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेता संजय मोने यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 22 नोव्हेंबर : झी मराठीवर चला हवा येऊ द्या, आम्ही सारे खवय्ये आणि होम मिनिस्टरनंतर अजून २ नवे कथाबाह्य कार्यक्रम सादर होणार आहेत. त्यातील एक कार्यक्रम हा चॅट शो असणार आहे. त्या कार्यक्रमाचं नाव 'कानाला खडा' असं आहे. या चॅट शोमध्ये कलाकारांशी गप्पा मारण्यासाठी आणि त्यांची टेर खेचण्यासाठी एखादं मिश्किल व्यक्तिमत्त्वच सूत्रसंचालकाच्या भूमिकेत असलं पाहिजे आणि म्हणूनच या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेता संजय मोने यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

आजपर्यंत प्रेक्षकांनी संजय मोने यांना अनेक मालिकांतून वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलं आहे तसंच त्यांच्या कामावर प्रेमाचा वर्षाव देखील केला आहे. आता चाहते संजय मोने यांना वेगळ्या भूमिकेत पाहू शकतील. या कार्यक्रमाबद्दलची माहिती गुलदस्त्यात असली तरी ही प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी घेऊन येणार हा कार्यक्रम या महिन्याच्या अखेरीस सादर होणार आहेत हे मात्र नक्की.

संजय मोने हे त्यांच्या नव्या भूमिकेबद्दल म्हणाले, 'आजवर प्रेक्षकांनी माझी प्रत्येक भूमिका स्वीकारली आणि त्यांच्या प्रेमाने माझ्या कामाची पोचपावती देखील दिली. कलाकारांशी गप्पा मारायला मी सज्ज आहे. माझं आणि झी मराठीचं नातं खूप जुनं आहे आणि मी झी मराठीचा आभारी आहे की त्यांनी माझी या सूत्रसंचालकाच्या भूमिकेसाठी निवड केली.'

संजय मोने स्वत: पटकथा, संवाद लिहीत असतात. अभिनयातलं त्यांचं विनोदाचं टायमिंगही अचूक असतं. त्यामुळे या शोबद्दलही रसिकांच्या अपेक्षा आहेत. झी मराठी ही वाहिनी 'जिथे मराठी, तिथे झी मराठी' या धोरणाप्रमाणेच जगातील कानाकोपऱ्यात असलेल्या आपल्या रसिक प्रेक्षकांचे गेल्या २ दशकांपासून अविरत मनोरंजन करत आली आहे.

Video : रिसेप्शनमध्ये सोनेरी रंगाच्या कपड्यात झळकले दीपिका-रणवीर

First published: November 22, 2018, 11:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading