मुंबई 22 मे: संजय मोने (Sanjay Mone) हे मराठी मनोरंजसृष्टीतील एक नामांकित अभिनेते म्हणून ओळखले जातात. अभिनयासोबतच ते सोशल मीडियावर देखील सक्रिय असतात. सभोवताली घडणाऱ्या विविध घडामोडींवर ते अनेकदा गंमतीशीर टीप्पण्या करताना दिसतात. त्यांच्या विनोदी स्वभावामुळंच ते चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असतात. मात्र यावेळी संजय मोने एका वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आहेत. LG कंपनीच्या वॉरंटी प्रकरणामुळं सध्या ते त्रस्त आहेत. अन् यासाठी त्यांनी चाहत्यांकडे मदत मागितली आहे. (Lg company customer service)
पाहूया हे प्रकरण आहे तरी काय?
“LG कंपनीचं वॉशिंग मशीन गेल्या वर्षी जून महिन्यात विकत घेतलं. कालपासून कपडे धुवायला टाकल्यावर चक! चक! असा आवाज येतोय. म्हणून मी LG customer care ला फोन केला. warranty period मध्ये आहे असं सांगितलं. समोर आदित्य नावाचा माणूस (an executive) बोलत होता. माझं म्हणणं ऐकून घेतल्यावर तो म्हणाला lockdown मुळे आम्ही warranty वगैरे सगळं देऊ शकत नाही. पण तुम्ही जर येणा-या माणसाचे 475 रु. अधिक जर काही भाग खराब झाला असेल, त्याचे पैसे द्यावे द्यावे लागतील. मग warranty ला काय अर्थ आहे? त्यावर मी त्याला सांगितलं की ग्राहक मंचाकडे तक्रार करेन त्यावर तो म्हणाला "जो करना वोह करलो. नहीँ तो lockdown के बाद आदमी आयेगा. आता यावर पुढे काय करता येईल? मला त्या "आदित्य"ला धडा शिकवायचाय. lockdown काही आपण नाही घोषित केला ना? आपल्या भल्या साठी तो आहे. शिवाय त्यांनी विक्री बंद केली नाहीये.. ती चालूच आहे.पु ढे काय करू?” अशी पोस्ट करत आदित्यला धडा शिकवण्यासाठी संजय मोने यांनी चाहत्यांकडे मदत मागितली आहे.
‘यासाठी मोदींना ऑस्कर द्या’; राम गोपाल वर्मांनी Video शेअर करत उडवली खिल्ली
प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूवर आपल्याला वॉरंटी मिळते. जर ती वस्तू वॉरंटी काळात खराब झाली तर ती दुरुस्त करुन देण्याची जबाबदारी त्या कंपनीची असते. मात्र असं असताना देखील LG कंपनी आपली जबाबदारी झटकत आहे. शिवाय घरी येऊन मशीन दुरुस्त करण्यासाठी त्यांचे कस्टमर केअरमधील मंडळी अधिकचे पैसे मागत आहे. अन् हा प्रकार रोखण्यासाठी चाहत्यांकडे काही उपाय आहे का? अन् असल्यास तो सांगावा अशी विनंती चाहत्यांना करत आहेत.
Published by:Mandar Gurav
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.