S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

'पद्मावती' 17 नोव्हेंबरला होणार रिलीज

संजय लीला भन्साळींचा बहुप्रतिक्षित 'पद्मावती' सिनेमा १७ नोव्हेंबरला सर्वत्र रिलीज होतोय.

Sonali Deshpande | Updated On: Apr 13, 2017 05:54 PM IST

'पद्मावती' 17 नोव्हेंबरला होणार रिलीज

13 एप्रिल : संजय लीला भन्साळींचा बहुप्रतिक्षित 'पद्मावती' सिनेमा १७ नोव्हेंबरला सर्वत्र रिलीज होतोय. 'हा एक असा ऐतिहासिक सिनेमा असेल जो आजपर्यंत प्रेक्षकांनी पाहिला नसेल,'असं वायकॉम १८ चे मुख्य अधिकारी अजित अंधारे यांनी सांगितलं.

ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या या सिनेमात रणवीर सिंग सुलतान अलाउद्दीन खिलजी यांची भूमिका साकारतोय, जो महाराणी पद्मावतीवर जीवापाड प्रेम करतो. या सिनेमात दीपिका पदुकोण पद्मावतीची भूमिका करतेय, तर शाहिद कपूर राजा रावल रमन सिंहच्या भूमिकेत दिसणारेय.

'रणवीर, दीपिका आणि शाहीद या सिनेमासाठी फार मेहनत घेत आहेत. आम्ही हा सिनेमा १७ नोव्हेंबर २०१७ ला सर्वत्र प्रदर्शित करणार असून या वर्षीचा हा सर्वात मोठा आणि आगळावेगळा सिनेमा असेल,' असंही अंधारे यांनी सांगितलं.रणवीर आणि दीपिकाने याआधीही भन्साळींच्या 'रामलीला' आणि 'बाजीराव मस्तानी' या सिनेमात अप्रतिम काम केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 13, 2017 05:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close