'देवदास' येतोय 3डीमध्ये!

2002 ला प्रदर्शित झालेला या चित्रपटाला या वर्षी प्रदर्शित होऊन 15 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं देवदास 3डीमध्ये रिलीज होतोय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 11, 2017 03:28 PM IST

'देवदास' येतोय 3डीमध्ये!

11 जून : देवदासची कथा थिएटरच्या रुपेरी  पडद्यावर कितीदा तरी साकारली गेलीय. पण संजय लीला भन्साळीच्या देवदासची बात काही औरच. 2002 ला प्रदर्शित झालेला या  चित्रपटाला या वर्षी प्रदर्शित होऊन 15 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं देवदास 3डीमध्ये रिलीज होतोय.

डोळे दिपवणारे  भव्य-दिव्य सेट्स,ताल धरुन नाचायला लावणारे ,मन डोलावणारे  'डोला'सारखे डान्सेस ,आणि ऐकत रहावसं वाटणारं कर्णमधुर संगीत. सारंच थक्क करुन टाकणारं.  आणि याच निमित्ताने संजय लीला भन्साळीचा देवदास पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला  येतोय.  पण यावेळी तो अजून भव्य असणारेय. त्याच्या रूपाला एक नवी चकाकी येणार आहे. ही चकाकी म्हणजे ३डीची चकाकी!

देवदास 3डीत रिलीज होतोय.जगाला वेड लावणाऱ्या 3डी मार्केटमध्ये देवदास धडक देतोय. या 12 जुलैला तो रिलीज होतोय. 3डी मध्ये रिलीज करण्याआधी देवदासची प्रत्येक फ्रेम भन्साळी साहेबांनी नीट पाहिली आणि  समाधान झाल्यावर  त्यांनी 3डी मध्ये प्रदर्शित करायचा निर्णय घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 11, 2017 03:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...