मुंबई, 13 जून : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी नुकतंच त्यांची भाची शरमिन सेहगलला ‘मलाल’ सिनेमातून लाँच केलं. या सिनेमामध्ये तिच्या सोबत जावेद जाफरीचा मुलगा मीझान दिसणार आहे. याशिवाय भन्साळी सध्या अभिषेक कपूरचा ‘बालाकोट एअर स्ट्राइक’वर आधारित असलेल्या सिनेमाची निर्मिती करत आहेत. याशिवाय त्याचा आगामी सिनेमा ‘इन्शाअल्लाह’चंही शूटिंग सुरू होणार आहे. पण या सगळ्यातच संजय लीला भन्साळी लवकरच स्किन कलर डिस्क्रिमिनेशन (वर्णभेदाच्या)च्या मुद्द्यावर सिनेमाची निर्मिती करणार असल्याचं समजत आहे. सूत्राच्या माहिती नुसार भन्साळीं या सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम करत असून लवकरच ते या सिनेमाची घोषणा करतील.
देसी गर्लनं घातली भारताच्या सन्मानात भर, प्रियांकाला ‘हा’ विशेष पुरस्कार जाहीर
भन्साळींच्या एका जवळच्या व्यक्तीनं ‘मिड डे’शी बोलताना सांगितलं, ‘भन्साळी या विषयावर आधारित सिनेमाची निर्मिती करण्याच्या तयारीत असून ते या सिनेमासाठी नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा विचार करत आहेत. यासंबंधी त्याची काही दिग्दर्शकांशी बोलणी सुरू आहेत मात्र यासाठी अद्याप कोणत्याही दिग्दर्शकाचं नाव कन्फर्म झालेलं नाही.’ सिने इंडस्ट्रीमध्ये काम करायचं असेल तर तुमच्या त्वचेचा रंग उजळ असायला हवा असाच काहीसा समज झालेला आहे. सावळा वर्ण असलेल्या मुलींना या ठीकाणी अनेक खस्ता खाव्या लागतात. पण असं असलं तर मागच्या काही वर्षात हे चित्र बदलताना दिसत आहे अणि याच मुद्द्यावर भन्साळी आता नव्या सिनेमाची निर्मिती करणार आहेत.
घरी असताना दीपिका अशी करते रणवीरची धुलाई, हा व्हिडिओ आहे पुरावा
काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीनं फेअरनेस क्रीमची जाहिरात नाकारली. त्यानंतर वर्णभेदाचा हा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला. पल्लवीनं ही जाहिरात नाकरण्याचं कारणही सांगितलं होतं. मला माझ्या मुळ रंगासोबत स्वीकारलं आहे आणि मला अशा प्रकारची जाहिरात करून लोकांची दिशाभूल करायची नाही असं पल्लवी म्हणाली होती. याशिवाय अभिनेता अभय देओलनं सुद्धा ट्विटरवर फेअरनेस क्रीमच्या विरोधात कॅम्पेन सुरू केलं आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री काजल अग्रवालनं तिचा नो मेकअप लुक शेअर करत सर्वांना आपल्या मुळ रंगाला स्वीकारण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या #UnfairandLovely कॅम्पेन सुरू आहे. पण भन्साळी यांनी या विषयावर सिनेमाची निर्मिती केल्यास हा सिनेमा या कॅम्पेनचा चेहरा बनू शकतो.