'पद्मावती'बद्दल संजय लीला भन्साळींचा महत्त्वाचा खुलासा

'पद्मावती'बद्दल संजय लीला भन्साळींचा महत्त्वाचा खुलासा

'पद्मावती' सिनेमाबद्दल बऱ्याच चर्चा सुरू आहेत. नुकतीच एक बातमी पसरली होती. पद्मावती आणि अल्लाऊद्दीन खिलजी म्हणजे दीपिका आणि रणवीर यांच्यात रोमँटिक ड्रीम सिक्वेन्स आहे.

  • Share this:

09 नोव्हेंबर : 'पद्मावती' सिनेमाबद्दल बऱ्याच चर्चा सुरू आहेत. नुकतीच एक बातमी पसरली होती. पद्मावती आणि अल्लाऊद्दीन खिलजी म्हणजे दीपिका आणि रणवीर यांच्यात रोमँटिक ड्रीम सिक्वेन्स आहे. पण संजय लीला भन्साळींनी ही अफवा असल्याचं म्हटलंय. पद्मावती आणि खिलजी यांच्यात काहीच संवाद नाहीय.

एका व्हिडिओ रेकाॅर्डिंगद्वारे संजय लीला भन्साळींनी हे स्पष्ट केलं की पद्मावती आणि अल्लाऊद्दीन या दोघांमध्ये सिनेमात काहीच संपर्क दाखवलेला नाही.

भन्साळींच्या एका निकटवर्तीय सहकाऱ्यानं सांगितलं, ' दीपिका आणि रणवीर सिंगनं वेगवेगळं शूटिंग केलंय. कारण सिनेमात ते कधीच एकत्र नाहीत.'

संजय लीला भन्साळींनी खुलासा तर केलाय. पण दीपिका-रणवीरच्या फॅन्सची यामुळे पार निराशा झालीय. त्यांना दोघांना एकत्र पाहता येणार नाही.

First published: November 9, 2017, 4:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading