दुसऱ्याच आठवड्यात 'पद्मावत'चा '200 कोटीं'चा टप्पा पार

दुसऱ्याच आठवड्यात 'पद्मावत'चा '200 कोटीं'चा टप्पा पार

कोणत्याही खानची मक्तेदारी नसणारा आणि 200 कोटींचा गल्ला जमवणारा बाहुबली 2 नंतर पद्मावतने बाजी मारली आहे.

  • Share this:

06 फेब्रुवारी : 2018चा पहिला ब्लॉकबस्टर हिट 'पद्मावत' या सिनेमाद्वारे बॉक्स ऑफीसवर चांगलाच गाजतोय. काही राज्यांमध्ये हा सिनेमा अजूनही दाखवला जात नसूनही पद्मावतने 215 कोटींचा गल्ला जमवण्यात यश मिळवलं आहे. कोणत्याही खानची मक्तेदारी नसणारा आणि 200 कोटींचा गल्ला जमवणारा बाहुबली 2 नंतर पद्मावतने बाजी मारली आहे. स्रीकेंद्री सिनेमांमध्ये हा पहिला इतकं मोठं यश मिळवणारा सिनेमा ठरला आहे.

त्यामुळे वादग्रस्त ठरलेला आणि देशभरातून विरोध केलेल्या सिनेमाला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली आहे. त्याचबरोबर दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहीद कपूरच्या अभिनयानंही हा सिनेमा चाहत्यांवर भूरळ घालणार ठरला आहे.

संजय लीला भंसाळीच्या पद्मवातनं अवघ्या दुसऱ्याचं आठवड्यात 200 कटींची कमाई केली आहे. अजूनही या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जोर धरला आहे. या सिनेमाच्या कमाईचे आकडे ट्रेंड अॅनालिस्ट तरण आदर्श यांने ट्विटद्वारे सांगितले आहेत.

या सिनेमाच्या यशाबद्दल अभिनेता रणवीर सिंगला विचारलं असता, तो म्हणाला, 'संजय सर ने मला या सिनेमाबद्दल विचारलं तेव्हा मी खूप घाबरलो होतो. कारण मी माझ्या करिअरच्या अशा वळणावर आहे जिथे मला खलनायकाची भूमिका साकारण्यासाठी खूप कठीण गेलं. पण मी आता खूप खुश आहे की माझ्या चाहत्यांनी आणि सगळ्यांनी या सिनेमाला इतकं प्रेम दिलं.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 6, 2018 11:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading