PM मोदींवरील सिनेमानंतर भन्साळी करणार बालाकोट एअर स्ट्राइकवर सिनेमाची निर्मिती

PM मोदींवरील सिनेमानंतर भन्साळी करणार बालाकोट एअर स्ट्राइकवर सिनेमाची निर्मिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘मन बैरागी’ सिनेमाची निर्मिती करणारे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आता बालाकोट एअर स्ट्राइकवर सिनेमा तयार करणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘मन बैरागी’ सिनेमाची निर्मिती करणारे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आता बालाकोट एअर स्ट्राइकवर सिनेमा तयार करणार आहेत. हा सिनेमा संजय लीला भन्साळी यांच्यासोबत टी-सीरिजचे मालक भूषण कुमार प्रोड्युस करणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन ‘केदारनाथ’ 'रॉकऑन' आणि ‘कई पो छे’ या सिनेमाचे दिग्दर्शक अभिषेक कपूर करणार आहेत.

या नव्या सिनेमाची घोषणा संजय लीला भन्साळी यांच्या प्रॉडक्शन हाउसने ट्विटरवर केली. त्यांनी लिहिलं, संजय लीला भन्साळी, भूषण कुमार, महावीर जैन आणि प्रज्ञा कपूर मिळून भारताच्या सुपुत्रांना समर्पित करत त्यांच्या शौर्याची कथा दाखवण्यासाठी 2019च्या बालाकोट एअर स्ट्राइकवर आधारित एक सिनेमाची निर्मिती करत आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक अभिषेक कपूर करणार आहेत.

रानू मंडलचं ‘तेरी मेरी...’ नाही तर ‘हे’ आहे Google वर सर्वाधिक सर्च केलेलं गाणं

या सिनेमाची स्टारकास्ट आणि इतर माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. भन्साळींच्या अगोदर अभिनेता विवेक ओबेरॉयनं सुद्धा फेब्रुवारी 2019 मध्ये बालाकोट एअर स्ट्राइकवर सिनेमाची निर्मिती करण्याची घोषणा केली होती. पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं 26 फेब्रुवारीला पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादी संघटनाचे तळ उद्ध्वस्त करत एअर स्ट्राइक केला होता.

करिनाच्या शोमध्येच सासू शर्मिला टागोरनी समजावला मुलगी आणि सूनेमधील फरक

मलायकाशी घटस्फोट, गर्लफ्रेंड जॉर्जियाशी दुसऱ्या लग्नाच्या प्रश्नावर भडकला अरबाज!

Published by: Megha Jethe
First published: December 13, 2019, 3:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading