'हे' आहेत संजय जाधवचे 'लकी' स्टार्स

आता संजय जाधवनं सिनेमातल्या कलाकारांना समोर आणलंय. तेही युट्युबवरून.

News18 Lokmat | Updated On: Sep 7, 2018 04:31 PM IST

'हे' आहेत संजय जाधवचे 'लकी' स्टार्स

मुंबई, 7 सप्टेंबर : संजय जाधवच्या लकी सिनेमाचं प्रमोशन मोठं हटके झालं होतं. सई ताम्हणकर, उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, स्पृहा जोशी, तेजस्विनी पंडित, सोनाली खरे सगळ्यांनीच मी लकी आहे, असं सांगितलं. त्यामुळे सिनेमात एवढी सगळी मंडळी आहे, असा समज झाला होता. पण तसं नाहीय. आता संजय जाधवनं सिनेमातल्या कलाकारांना समोर आणलंय. तेही युट्युबवरून.

अभिनेता अभय महाजन आणि अभिनेत्री दीप्ती सती आपल्या सिनेमाचे हिरो-हिरोइन असल्याची घोषणा संजय जाधवने सोशल मीडियाव्दारे केली आहे. विशेष बाब म्हणजे आपल्या कलाकारांना लाँच करताना त्यांनी एक गाणंच चित्रीत केलं आहे.

याविषयी निर्माते सूरज सिंग म्हणाले ,'हेच तर दादांचं वैशिष्ट्य आहे. दादा नेहमी काहीतरी वेगळे करतात. त्यांनी त्यांच्या मागच्या सिनेमाचा टिझर ६० कॅमेऱ्यांनी चित्रीत केला होता. तर आता आमच्या सिनेमाचे हिरो-हिरोइन लाँच करताना हे धमाल गाणं दादांनी त्यांच्या स्टाइलने चित्रीत केलं आहे. आता जेवढे गाणे एण्टरटेनिंग आहे. त्यापेक्षाही अधिक धमाल तुम्हांला चित्रपट पाहताना येईल, यावर मला पूर्ण विश्वास आहे.'

अभय आणि दीप्तीचा हा पहिलाच सिनेमा. त्याआधी संजयदादांनी इन्स्ट्राग्रामवर नवा हिरो, नवी हिराॅइन असं टाकून उत्सुकता वाढवली होती. संजयदादांनी दुनियादारी, प्यारवाली लव्हस्टोरी, ये रे ये रे पैसा, गुरू असे सिनेमे देऊन मराठी प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता मिळवलीय.

लकीसाठी सुरुवातीला ज्या कलाकारांवर टिझर चित्रीत केलाय, ते संजय जाधवचे मित्रच आहेत. आता नव्या चेहऱ्यांना हा सिनेमा किती लकी ठरतोय, हे कळेलच.

Loading...

PHOTOS : आपल्या छोट्या भावाला भेटायला पोचली शाहीदची लाडकी लेक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 7, 2018 04:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...