मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘तू आम्हाला सोडून का गेलास?’; मित्राच्या आठवणीमुळं संजय जाधवचा बांध फुटला

‘तू आम्हाला सोडून का गेलास?’; मित्राच्या आठवणीमुळं संजय जाधवचा बांध फुटला

निशिकांत यांच्या आठवणीनं मराठी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक संजय जाधव (Sanjay Jadhav) भावुक झाला आहे. त्यानं आपल्या खास मित्रासोबतचे काही फोटो शेअर करुन आपल्या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला आहे.

मुंबई 29 एप्रिल: प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते निशिकांत कामत (Nishikant Kamat) यांचं वर्षभरापूर्वी लिव्हर सिरोसिसमुळं निधन झालं. हैद्राबादमधील एआयजी रुग्णालयात जवळपास वर्षभर त्यांच्यावर उपचार सुरु होता. परंतु प्रयत्नांची कसोशी करुनही डॉक्टर त्यांचे प्राण वाचवू शकले नाहीत. दरम्यान निशिकांत यांच्या आठवणीनं मराठी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक संजय जाधव (Sanjay Jadhav) भावुक झाला आहे. त्यानं आपल्या खास मित्रासोबतचे काही फोटो शेअर करुन आपल्या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला आहे.

संजयच्या एका मित्रानं त्यांच्या ग्रुपचे काही जुने फोटो त्याला पाठवले होते. या फोटोंमध्ये त्याला निशिकांत यांच्यासोबतचे देखील काही फोटो सापडले. हे फोटो पाहून त्याच्या आठवणी ताज्या झाल्या आणि ते आता या जगात नसल्याच्या दुःखावरची खपली निघाली. निशिकांत यांच्या मृत्यूनंतर संजयनं कुठलीच पोस्ट शेअर केली नव्हती. या मागचं खरं कारण या फोटोंद्वारे त्यानं सांगितलं.

‘दु:खात आनंद शोधायचे माझे बाबा’; मुलानं शेअर केला इरफान खानचा हृदयस्पर्शी फोटो

संजयनं हे सर्व फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सोबतच एक भावुक पोस्ट देखील लिहिली आहे. तो म्हणाला, “तू गेल्यानंतर मी सोशल मीडियावर काहीच लिहीलं नव्हतं, कारण मन नव्हतं. काय लिहिणार? आरआयपी निशी? नाही रे, पण वासूने आज मला हे फोटो पाठवले आणि वाटलं की हे शेयर करावं. आपल्याला पार्टी करण्यासाठी कोणतच निमित्त लागायचं नाही. सिनेमा सुरु झाला, चांगला शॉट घेतला, वाईट काम केलं, सिनेमा संपला, पहिली कॉपी निघाली, अवॉर्ड मिळाला किंवा नाही मिळाला, आपण नेहमी पार्टी केली. कोण चांगला फिल्ममेकर आहे ? तू की मी.. यावर अनेकदा आपण पार्टी करताना चर्चा केली आहे. आपल्यात नेहमी मतभेदही असायचे, आपण मुद्दे एकमेकांसमोर मांडायचो पण आपल्याकडे वेळ होता, सोनेरी क्षण.. मला खात्री आहे की अमित पवार आणि तू नव्या प्रोजेक्टबद्दल चर्चा करत असणार, नक्कीच हातात ग्लास घेऊन.. चिअर्स निशी..”

First published:

Tags: Bollywood actor, Entertainment, Marathi cinema