S M L

मुन्नाभाईची लेक होणार डाॅक्टर!

त्रिशलाने हॉफ्स्ट्रा युनिव्हर्सिटीमधून पोस्ट ग्रँज्युएशन पूर्ण केलंय. यानंतर चार वर्ष अजून शिकून डॉक्टरेट मिळवण्याचा तिचा विचार आहे.

Sonali Deshpande | Updated On: May 23, 2018 05:49 PM IST

मुन्नाभाईची लेक होणार डाॅक्टर!

२३ मे : संजय दत्तची मुलगी त्रिशला बॉलिवूडमधील ग्लॅमरपासून तशी दूरच आहे. फक्त सोशल मीडियावर बोल्ड फोटोज पोस्ट करून कधेमधे ती चर्चेत असते. मात्र सध्या ती एका खास कारणामुळे चर्चेत आहे.

त्रिशलाने हॉफ्स्ट्रा युनिव्हर्सिटीमधून पोस्ट ग्रँज्युएशन पूर्ण केलंय. यानंतर चार वर्ष अजून शिकून डॉक्टरेट मिळवण्याचा तिचा विचार आहे. नुकताच तिचा पदवीदान समारंभ पार पडला.

त्याचे काही फोटोज तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केले. थोडक्यात काय मुन्नाभाई जरी डॉक्टर होऊ शकला नसला तरीही त्याचं ते अर्धवट राहिलेलं स्वप्न त्याची मुलगी पूर्ण करणारे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 23, 2018 05:49 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close