News18 Lokmat

पुढच्या ईदला सलमान रणबीरची टक्कर

राजकुमार हिराणी यांचा संजय दत्तच्या जीवनावर आधारित सिनेमा 2018च्या ईदच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे. या सिनेमात रणबीर कपूर संजुबाबाच्या भूमिकेत दिसणार.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 4, 2017 04:06 PM IST

पुढच्या ईदला सलमान रणबीरची टक्कर

04जुलै: ईदचा सण दबंग खान सलमानच्या सिनेमांसाठी रिझर्व असतो हे एव्हाना पक्कं झालंय. मात्र आता 2018च्या ईद रिलीजवर रणबीर कपूरने हल्लाबोल करण्याचा विचार केलाय.

राजकुमार हिराणी यांचा संजय दत्तच्या जीवनावर आधारित सिनेमा 2018च्या ईदच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे. या सिनेमात रणबीर कपूर संजुबाबाच्या भूमिकेत दिसणार असून त्याने यासाठी फार मेहनतसुद्धा घेतलीय.असं म्हटलं जातंय की हा सिनेमा रणबीर कपूरच्या करिअरमधला मैलाचा दगड असेल. तो ज्याप्रकारे तयारी करतोय ते पाहता त्याला पुढच्या वर्षी अभिनयाचे सगळे पुरस्कार मिळाले तर नवल वाटायला नको.

त्याच्या या चित्रपटातल्या लूकनंही सगळ्यांना शॉक दिलाय. रणबीर कपूरसोबतचा दिया मिर्झा,सोनम कपूर ,परेश रावल,मनीषा कोयराला आणि विवेक कौशलदेखील प्रमुख भूमिकेत आहेत.

आता ईद म्हटल्यांवर सल्लू मिया आपला सिनेमा तर रिलीज करणारंच त्यामुळे 2018च्या ईदला बॉक्स ऑफिसवर काटे की टक्कर होणार असं म्हणावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 4, 2017 04:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...