संजय दत्तचा Lung Cancer तिसऱ्या स्टेजवर; उपचारासाठी तातडीने अमेरिकेला हलवणार

संजय दत्तचा Lung Cancer तिसऱ्या स्टेजवर; उपचारासाठी तातडीने अमेरिकेला हलवणार

संजय दत्त याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे

  • Share this:

मुंबई, 11 ऑगस्ट : अभिनेता संजय दत्तबद्दल एक मोठी बातमी आली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत लीलावती रुग्णालयात दाखल झालेल्या संजय दत्तला कॅन्सर असल्याचं निदान झालं आहे. त्याला Lung Cancer असून तो तिसऱ्या स्टेजवर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संजय दत्तला तातडीने अमेरिकेत पुढील उपचारासाठी नेण्यात येणार आहे.

श्वास घेण्यास त्रास होत असल्याने 8 ऑगस्टला संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्याची Corona चाचणीसुद्धा झाली. Covid-19 चा रिपोर्ट निगेटिव्ह आला म्हणून दत्त कुटुंबीयांना दिलासा मिळाला असतानाच आता ही धक्कादायक बातमी आली आहे. चित्रपट व्यवसायाविषयीचे अभ्यासक आणि संपादक संजय नहाटा यांनी याबाबतचं Tweet केलं आहे.

तब्बल 6 तासांपूर्वी संजय दत्त यांनी ट्विटरवरुन चाहत्यांना आपण वैद्यकीय उपचारांसाठी छोटा ब्रेक घेत असल्याचे सांगितले होते. माझी काळजी करु नका मी लवकरच येईन, असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर आता चित्रपट समीक्षकांनी त्यांना Lung Cancer असल्याची माहिती दिली आहे.

हे वाचा-'डोबिंवली फास्ट'चा दिग्दर्शक निशिकांत कामतची प्रकृती गंभीर; रुग्णालयात केलं दाखल

आता पुढील उपचारासाठी त्याला तातडीने अमेरिकेला हलविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. संजय दत्तचा Lung Cancer तिसऱ्या स्टेजवरुन असून तातडीने उपचार सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: August 11, 2020, 11:28 PM IST

ताज्या बातम्या