बॉलिवूडच्या 'या' कलाकारांवर रिअल लाइफमध्ये लागला आहे 'कलंक'

बॉलिवूडच्या 'या' कलाकारांवर रिअल लाइफमध्ये लागला आहे 'कलंक'

संजय दत्त व्यतिरिक्त बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांच्यावर खऱ्या आयुष्यातही कलंक लागला आहेत.

  • Share this:

बॉलिवूडमधील वरुण धवन, आलिया भट, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि आदित्य रॉय कपूर अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या कलंक सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. ट्रेलर लाँचच्या वेळी अभिनेता संजय दत्तला, त्याच्या आयुष्यातील कोणता कलंक पुसून टाकावासा वाटतो असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर संजय दत्तनं मला माझ्या सर्व चूकांची शिक्षा मिळाली असून माझ्यावरील सर्व कलंक आता पुसले गेले आहेत असं उत्तर दिलं. पण संजय दत्त व्यतिरिक्त बॉलिवूडमधी असे काही कलाकार आहेत ज्यांच्यावर खऱ्या आयुष्यातही कलंक लागले आहेत. पाहूया कोण आहेत हे कलाकार...

बॉलिवूडमधील वरुण धवन, आलिया भट, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि आदित्य रॉय कपूर अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या कलंक सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. ट्रेलर लाँचच्या वेळी अभिनेता संजय दत्तला, त्याच्या आयुष्यातील कोणता कलंक पुसून टाकावासा वाटतो असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर संजय दत्तनं मला माझ्या सर्व चूकांची शिक्षा मिळाली असून माझ्यावरील सर्व कलंक आता पुसले गेले आहेत असं उत्तर दिलं. पण संजय दत्त व्यतिरिक्त बॉलिवूडमधी असे काही कलाकार आहेत ज्यांच्यावर खऱ्या आयुष्यातही कलंक लागला आहेत. पाहू या कोण आहेत हे कलाकार...

1993मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात अनेक लोकांचा बळी गेला. त्यानंतर अभिनेता संजय दत्तला अवैध्य शस्त्रं बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली. हा खटला दिर्घकाळ चालला आणि संजयला त्याची शिक्षा सुद्धा भोगावी लागली. संजय दत्तचा बायोपिक संजूमध्ये या सर्व गोष्टी विस्तारानं दाखवण्यात आल्या आहेत.

1993मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात अनेक लोकांचा बळी गेला. त्यानंतर अभिनेता संजय दत्तला अवैध्य शस्त्रं बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली. हा खटला दिर्घकाळ चालला आणि संजयला त्याची शिक्षासुद्धा भोगावी लागली. संजय दत्तचा बायोपिक संजूमध्ये या सर्व गोष्टी विस्तारानं दाखवण्यात आल्या आहेत.

बॉलिवूडचा दबंग सलमान खानवर एकूण दोन खटले चालू आहेत. 1998मध्ये वाइल्ड लाईफ प्रोटेक्शन अॅक्टच्या कलम 15नुसार सलमानवर काळवीटाची शिकार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यात सलमानला 5 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली. याशिवाय दारूच्या नशेत गाडी चालवताना मुंबईतील फुटपाथवर झोपलेल्या लोकांना चिरडल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सुपरस्टार सलमान खान आणि संजय दत्त यांच्याव्यतिरिक्त अभिनेता शाहरुख खानही वादात सापडला होता. 2002मध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप शाहरुख खानवर झाला होता. तसंच 'रईस'च्या प्रमोशन कार्यक्रमादम्यान कोटा रेल्वे स्टेशनवरील रेल्वे संपत्तीला नुकसान पोहोचवल्याचा आरोपही शाहरुखवर होता.

अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी शक्यतो कोणत्याही वादापासून दूर राहणंच पसंत करतो मात्र 2018मध्ये आपल्या पत्नीची हेरगिरी करून तिचे कॉल डिटेल्सचं रेकॉर्ड काढल्याचा आरोप नवाझु्द्दीनवर करण्यात आला होता.

अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी शक्यतो कोणत्याही वादापासून दूर राहणंच पसंत करतो मात्र 2018मध्ये आपल्या पत्नीची हेरगिरी करून तिचे कॉल डिटेल्सचं रेकॉर्ड काढल्याचा आरोप नवाझु्द्दीनवर करण्यात आला होता.

अभिनेता आदित्य पंचोली यांचा मुलगा सुरज पंचोली काही वर्षांपूर्वी मोठ्या वादात सापडला होता. अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्या प्रकरणात सुरजला दोषी धरण्यात आलं होतं. त्यावेळी सुरज आणि जिया रिलेशनशिपमध्ये असल्यानं सुरजवर थेट संशय घेतला जात होता.

90 व्या दशकातील सुपरस्टार गोविंदावर 'मनी है तो हनी है' या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान एका व्हिजिटरला मारहाण केल्याचा आरोप झाला होता. 2008मध्ये सुरू झालेली ही केस 2017 मध्ये संपली.

90 व्या दशकातील सुपरस्टार गोविंदावर 'मनी है तो हनी है' या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान एका व्हिजिटरला मारहाण केल्याचा आरोप झाला होता. 2008मध्ये सुरू झालेली ही केस 2017 मध्ये संपली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2019 03:51 PM IST

ताज्या बातम्या