Home /News /entertainment /

वाह संजूबाबा मानलं तुला ! म्हणला, "कॅन्सरशी जिद्दीने झुंज देणार" पाहा VIDEO

वाह संजूबाबा मानलं तुला ! म्हणला, "कॅन्सरशी जिद्दीने झुंज देणार" पाहा VIDEO

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) कॅन्सरशी लढण्यासाठी जिद्दीने उभा राहतोय. संजूबाबाने आपल्या नव्या सिनेमांबद्दलही माहिती दिली आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  मुंबई, 15 ऑक्टोबर: बॉलिूवड अभिनेत संजय दत्त (Sanjay Dutt)ला कॅन्सर झाला आहे हे ऐकून त्याच्या चाहत्यांना चिंता वाटायला लागली होती. ऑगस्ट महिन्यात संजूबाबाला फुफ्फुसाचा कर्करोग (Lung Cancer) असल्याचं निदान झालं होतं. गेल्या काही दिवसांपूर्वी कॅन्सरशी झुंज देणाऱ्या संजय दत्तचा फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत होता. आता संजय दत्तच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संजय दत्त आजारपणातही जिद्दीने उभा राहिला आहे. "कॅन्सरला माझ्यापुढे झुकायला लावीन" असं संजय दत्त म्हणतोय. नुकताच त्याने एक मस्त हेअरकटही केला आहे. हेयर स्टायलिस्ट आलिम हकीम (Aalim Hakim)ने संजय दत्तच्या नव्या लूकमधला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये संजयने आपल्या नव्या सिनेमाबद्दल माहितीदेखील दिली आहे. संजूबाबाचा व्हिडीओ व्हायरल हेयर स्टायलिस्ट आलिम हकीम (Aalim Hakim) ने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये संजय दत्तला 'रॉकस्टार' म्हटलं आहे. संजूबाबाने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे की, "हाय मी संजय दत्त, मला मुंबईत परत आल्यावर खूप चांगलं वाटत आहे. मी नवीन हेअरकटही केला आहे. कॅन्सरच्या आजाराने मला ग्रासलं आहे पण मी कॅन्सरवर नक्की मात करीन"
  संजय दत्तने या व्हिडीओमधून नव्या सिनेमाबद्दल माहिती दिली आहे. 'केजीएफ चॅप्टर 2' या नव्या सिनेमासाठी मी दाढी वाढवली आहे. या सिनेमाचं शूटिंग 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे." असंही संजय दत्त म्हणाला. या सिनेमामध्ये संजयचा निगेटिव्ह रोल असेल. 'केजीएफ चॅप्टर 2' प्रमाणेच संजय दत्तचे भुज: द प्राइड ऑफ इंडिया, टोरबाज, समशेरा आणि पृथ्वीराज असे अनेक नवे सिनेमे लवकरच येणार आहेत. काही दिवसांपूर्वी संजय दत्तचा सडक 2 हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमामध्ये पूजा भट्ट, आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर अशा बड्या कलाकारांनी काम केलं होतं. पण हा सिनेमा दणदणीत आपटला. यूट्यूबवर या सिनेमाच्या ट्रेलरला 12 मिलियन पेक्षा जास्त डिस्लाइक्स मिळाले. या सिनेमाने डिस्लाइक्सचा रेकॉर्ड बनवला आहे.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Bollywood, Cancer, Sanjay dutt

  पुढील बातम्या