माझ्या कपाळावरचा कलंक आता पुसला गेलाय - संजय दत्त

माझ्या कपाळावरचा कलंक आता पुसला गेलाय - संजय दत्त

कलंक सिनेमाचा टीझर लाँच झाला. यावेळी संजय दत्तला मीडियानं विचारलं की कुठला कलंक तुला पुसून टाकायचाय?

  • Share this:

शिखा धारिवाल

मुंबई, 12 मार्च : आज मुंबईत करण जोहरचा बहुचर्चित सिनेमा कलंकचा टीझर लाँच झाला. यावेळी माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा ,आलिया भट्ट ,वरुण धवन आणि करन जोहर यांच्याबरोबर सिनेमाची अख्खी टीम उपस्थित होती. यावेळी मीडियासोबत कलाकारांशी झालेल्या प्रश्नोत्तरानं रंगत आणली.

यावेळी संजय दत्तला मीडियानं विचारलं की कुठला कलंक तुला पुसून टाकायचाय? त्यावर त्यानं उत्तर दिलं, माझ्या कपाळावरही एक कलंक होता. कदाचित आता तो निघून गेलाय.

संजय दत्तचा इशारा टाडा खटल्याकडे होता. 1993मध्ये बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याबद्दल संजय दत्तला 5 वर्षांची शिक्षा झाली होती. ती शिक्षा पूर्ण करून संजय दत्तनं पुन्हा एकदा कमबॅक केलंय.

या ट्रेलरमध्ये सिनेमाची भव्यता जाणवते.प्रत्येक कलाकारावर जास्त मेहनत घेतल्याचंही कळतंय.

१७ एप्रिलला प्रदर्शित होणारा हा सिनेमा एक पीरिएड ड्रामा आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमातील कलाकारांचा लूक सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला होता. ही एका कुटुंबाची गोष्ट आहे. जातीय दंगली सुरू झाल्यानंतर या कुटुंबाशी निगडीत वास्तव समोर यायला लागतं. सुमारे ८० कोटींमध्ये हा सिनेमा तयार करण्यात आला आहे. करण जोहर आणि साजिद नाडियाडवाला यांच्या बॅनर अंतर्गत या सिनेमाची निर्मिती झाली आहे. सिनेमात वरुण धवनने एकाहून एक सरस स्टंट केले आहेत.

सिनेमाच्या चित्रीकरणावेळी वरुणला मोठी दुखापतही झाली होती. आदित्य रॉय कपूर आणि आलियाबद्दल बोलायचे झाले तर, दोघं पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत.

अभिषेक वर्मन यांच्या दिग्दर्शनात तयार करण्यात आलेला हा सिनेमा अनेक कारणांमुळे खास आहे. या सिनेमात एकाच वेळी अनेक स्टार कलाकारांना पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

#FitnessFunda : ...म्हणून राणादा नेहमी जिंकतो कुस्ती

First published: March 12, 2019, 4:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading