राजकुमार हिरानींवरील लैंगिक शोषणाच्या आरोपांवर संजय दत्त म्हणतो...

राजकुमार हिरानींवरील लैंगिक शोषणाच्या आरोपांवर संजय दत्त म्हणतो...

दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यावर त्यांच्या 'संजू' सिनेमाच्या महिला असिस्टंट डायरेक्टरनं #MeToo मोहिमेअंतर्गत लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.

  • Share this:

मुंबई, 06 एप्रिल : मागील वर्षी म्हणजेच 2018 मध्ये अचानक आलेल्या 'मी टू' चळवळीत अख्खं बॉलिवूड ढवळून निघालं. या चळवळी अंतर्गत बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध व्यक्तींवर लैगिक शोषणाचे आरोप झाले. अभिनेत्री तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यांवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केल्यानंतर बॉलिवूडमधील इतर अनेकींनी याबाबत आवाज उठवायला सुरुवात केली आणि अनेक प्रसिद्ध व्यक्तींची नावं यात समोर आली. असाच एक आरोप प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यावरही लावण्यात आला. यावर नुकतंच राजकुमार हिरानींचा मित्र अभिनेता संजय दत्तनं आपलं मत मांडलं.

संजय दत्त त्याचा आगामी सिनेमा कलंकच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत असताना त्याला दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यावर लावण्यात आलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांविषयी प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना संजय म्हणाला, "माझा यावर अजिबात विश्वास बसत नाही कारण, मी राजकुमार हिरानींबरोबर बऱ्याच सिनेमात काम केलं आहे. मी त्यांना खूप चांगलं  ओळखतो. मला समजत नाही त्या महिलेनं एवढ्या दिवसांनंतर त्यांच्यावर आरोप का केला."

राजकुमार हिरानींवर लैंगिक शोषणाचा आरोप करण्याच्या महिलेवर संजयनं आपली नाराजी दर्शवली. याशिवाय त्यानं त्या महिलेच्या आरोपांवर काही प्रश्नही उपस्थित केले. तो म्हणाला, "जर त्या महिलेला आरोप करायचेच आहेत तर तिने राजकुमार हिरानींची पोलिसांकडे तक्रार का केली नाही. तिने आधी तक्रार दाखल करून नंतरच हिरानींवर अशाप्रकारचे आरोप करावे. हिरांनींवरील आरोपांमध्ये तथ्य आहे असं मला अजिबात वाटत नाही.

दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यावर त्यांच्या 'संजू' सिनेमाच्या महिला असिस्टंट डायरेक्टरनं #MeToo मोहिमेअंतर्गत लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. सिनेमाच्या पोस्ट प्रॉडक्शन दरम्यान माझं लैंगिक  शोषण करण्यात आलं तसंच हिरानींनी मला सिनेमातून काढून टाकण्याची धमकी दिल्याचंही त्या महिलेनं म्हटलं होतं. मात्र या आरोपांनंतर बॉलिवूडमधील अनेकांनी राजकुमार हिरानींची पाठराखणंही केली होती.

First published: April 6, 2019, 3:28 PM IST

ताज्या बातम्या