त्या एका फोनने आला संजय दत्त- माधुरीच्या नात्यात दुरावा?

संजयने त्याचा भूतकाळ मागे सोडला असा माधुरीचा विश्वास होता. मात्र या घटनेमुळे ती पुरती हलली.

  • Share this:

संजय दत्तच्या आयुष्यात मुली, अमली पदार्थ, खटले, शिक्षा, तुरुंग या सर्व गोष्टींचा भरणा चांगलाच आहे. गेल्या वर्षी त्याच्या आयुष्यावर एक बायोपिकही काढण्यात आला. रणबीर कपूरने संजू सिनेमात संजय दत्तची भूमिका साकारली होता.

असे म्हटले जाते की, जेव्हा संजयच्या जीवनावर बायोपिक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता तेव्हा माधुरीने संजयला फोन करून या सिनेमात तिचं नाव कुठेही न येण्याची विनंती केली होती.

आता दोघांचीही मुलं मोठी झाली असून २५ वर्ष जुन्या गोष्टी उकरत बसण्यात काही अर्थ नाही अशी माधुरीची भावना होती. पण अशी दोघांमध्ये कोणती गोष्ट आहे जी आजही माधुरी इतरांसमोर येऊ नये यासाठी आग्रही असते.

८० च्या दशकाच्या शेवटच्या काळात माधुरी बॉलिवूडची स्टार अभिनेत्री होती. तिच्या तेजाब आणि दिल यांसारख्या सिनेमांनी अनेक रेकॉर्ड मोडले होते. तर दुसरीकडे संजय दत्तलाही चांगले फॅन फॉलोविंग मिळत होते. दरम्यान दोघांनी ‘साजन’ सिनेमा साइन केला. या सिनेमातील गाणी आजही अनेकांच्या तोंडी आहेत.

असं म्हटलं जातं की, या सिनेमात रोमान्स करताना दोघं कधी एकमेकांच्या प्रेमात पडली हे त्यांनाही कळलं नाही. दरम्यान संजयचं लग्न झालं होतं आणि त्याला एक मुलगीही होती.

‘साजन’ सिनेमा सुपरहिट ठरला. दोघांच्या प्रेमावर प्रेक्षकांनीही मोहर लगावली. यानंतर दोघांनी ‘खलनायक’ सिनेमात पुन्हा एकत्र काम केलं. या सिनेमाच्या चित्रीकरणावेळी दोघं लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या तेव्हा येऊ लागल्या होत्या.

मीडिया रिपोर्टनुसार, माधुरीचे कुटुंब संजय दत्तशी लग्नाच्या पूर्ण विरोधात होते. संजयचे आधीच लग्न झाले होते आणि अनेक काळापासून तो अमली पदार्थांच्या आहारी गेल्यामुळे माधुरीच्या कुटुंबियांनी या लग्नाला कडाडून विरोध केला होता. माधुरी आणि संजयने कधीच त्यांच्या नात्याला अधिकृत मान्यता दिली नाही.

माधुरीला तिच्यामुळे संजयचं घर फुटलं असा कलंक स्वतःवर घ्यायचा नव्हता. १९९३ मध्ये संजय परदेशात सिनेमाचं चित्रीकरण करत असताना प्रिया दत्त यांनी माधुरीला फोन केला. या फोननंतर संजय आणि माधुरीच्या नात्यात अंतर येत गेलं. यातच संजयवर टाडा लावण्यात आला.

संजय जेव्हा भारतात परतला तेव्हा पोलिसांचा ताफा त्याची वाट पाहत होता. त्याला स्टेशनवरूनच अटक करण्यात आली. एखाद्यावर टाडाचा गुन्हा दाखल होणं म्हणजे आयुष्यभर तुरुंगात राहण्यासारखं होतं. त्यात बॉलिवूडचा स्टारला यात अटक झाल्यामुळे त्याकाळात फार मोठी चर्चा झाली होती.

संजयने त्याचा भूतकाळ मागे सोडला असा माधुरीचा विश्वास होता. मात्र या घटनेमुळे ती पुरती हलली. यानंतर संजयबद्दल तिला कोणतेही प्रश्न विचारण्यात आले तेव्हा माधुरीने शांत राहणं पसंत केलं. संजय तुरुंगात गेल्यानंतर माधुरीने हे प्रकरण तिथेच संपवलं.

संजय दत्तच्या पहिल्या पत्नीच्या मृत्युनंतर दुसरं लग्न केलं. दुसऱ्या लग्नही त्याचं फार काळ टिकलं नाही. दुसऱ्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर त्याने तिसरं लग्न केलं. संजयला तीन मुलं आहेत. तर माधुरीनेही डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं. माधुरीला दोन मुलं आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 12, 2019 07:26 PM IST

ताज्या बातम्या