Home /News /entertainment /

लंग कॅन्सरवर मात करत 'खलनायक' परतला; अवघड क्लायमॅक्स शूट करायला असा झाला सज्ज

लंग कॅन्सरवर मात करत 'खलनायक' परतला; अवघड क्लायमॅक्स शूट करायला असा झाला सज्ज

संजय दत्त KGF 2 या चित्रपटात ‘अधीरा’ (Adheera) ही खलनायकाची भूमिका साकारत आहे. जीवघेण्या मारामारीच्या प्रसंगाचं - क्लायमॅक्सचं शूटिंग सध्या हैदराबादमध्ये सुरू आहे.

हैदराबाद, 11 डिसेंबर : कर्करोगावरील उपचारानंतर अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) गेल्या महिन्यापासूनच आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र झाला आहे. गेल्या महिन्यात त्यानं ‘ भूज : द प्राईड ऑफ इंडिया’ (Bhuj: The Pride Of India) या चित्रपटाचं हैद्राबाद (Hyderabad) इथं शूटिंग केलं. आता याच शहरात ‘केजीएफ2’ (KGF 2) या चित्रपटासाठीही त्यानं शूटिंग सुरू केलं आहे. 'खलनायक' चित्रपटामुळे आपली वेगळी ओळक निर्माण करणारा हा अभिनेता KGF 2 मध्ये व्हिलनचीच भूमिका साकारत आहे. त्याच्या अधीरा (Adheera) नावाच्या भूमिकेचा अवघड क्लायमॅक्स सीन सध्या चित्रित होत आहे. दाक्षिणात्य अभिनेता यश याची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, संजय दत्त या चित्रपटात ‘अधीरा’ (Adheera) ही खलनायकाची भूमिका साकारात आहे. नायकाची भूमिका साकारणाऱ्या यशबरोबर (Yash) होणाऱ्या जीवघेण्या मारामारीच्या प्रसंगात त्याचा अंत होतो. प्रशांत नील (Prashanth Neel)यांच्या दिग्दर्शनाखाली दोन्ही अभिनेते हा अत्यंत महत्त्वाचा क्लायमॅक्सचा भव्य प्रसंग शूट करण्यासाठी सज्ज आहेत.  नायक आणि खलनायक यांच्यातील अवघड स्टंटस असलेल्या या प्रसंगाचे शुटिंग सध्या टप्प्याटप्प्यात सुरू आहे. कर्करोगावरील उपचार घेतल्यानंतर आता संजय दत्त एकदम फिट झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते (National Award Winner) अनबु आणि अरीवू हे (Anbu & Arivu) अॅक्शन डायरेक्टर्स या खास प्रसंगातील स्टंटससाठी काम करत आहेत. संजय दत्तही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास उत्सुक आहे. कोळसा खाणीच्या पार्श्वभूमीवर हा भव्य प्रसंग शूट करण्यात येत आहे. संजय दत्तनं यासाठी बॉडी डबल वापरावा असा आग्रह चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याला केला होता, मात्र संजय दत्तनं स्वतःच हे स्टंटस करण्यावर भर दिला.  ‘केजीएफ 2’चे शुटिंग या महिनाखेरपर्यंत चालणार असून, या प्रसंगाच्या शूटिंगबरोबर चित्रपटाचे शूटिंगही संपणार आहे. हे प्रसंग भव्य वाटावेत यासाठी  प्रयत्न करण्यात येत आहेत. हा सीन चित्रपटातील युएसपी (USP) ठरेल अशी दिग्दर्शकाला आशा आहे. पुढील वर्षी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. तर याचा पहिला टीझर अभिनेता यश याच्या वाढदिवशी जानेवारी 2021 अर्थात पुढील महिन्यात लाँच करण्यात येणार आहे. ‘भूज : द प्राईड ऑफ इंडिया’ या चित्रपटात संजय दत्त मुख्य गावकऱ्याच्या भूमिकेत असून, अजय देवगण(Ajay Devgan) एअरफोर्स पायलाटच्या मुख्य भूमिकेत आहे.
Published by:अरुंधती रानडे जोशी
First published:

Tags: Cancer, Sanjay dutt

पुढील बातम्या