या २ लग्न करणाऱ्या ‘खलनायका’मुळे माझं लग्न राहिलं - सलमानचा गौप्यस्फोट

या २ लग्न करणाऱ्या ‘खलनायका’मुळे माझं लग्न राहिलं - सलमानचा गौप्यस्फोट

सलमाननं लग्न न करण्यामागचं कारण काही दिवसांपूर्वी एका टीव्ही शोमध्ये सांगितलं.

  • Share this:

मुंबई, 29 जुलै : अभिनेता संजय दत्त आज 60 वा वाढदिवस साजरा करत आहे. संजू बाबा त्याच्या सिने कारकिर्दीपेक्षा जास्त गाजला तो त्याची अफेअर्स आणि त्याचं खासगी जीवन. पण याशिवाय त्याची एक गोष्ट जास्त चर्चेत राहिली ती म्हणजे सलमान खानसोबतची त्याची मैत्री. पण दोन लग्न करणाऱ्या संजय दत्त मित्र असूनही सलमाननं मात्र अद्याप लग्न केलेलं नाही. पण यालाही संजय दत्तला जबाबदार मानलं जातं. सलमानला जेव्हाही लग्नाविषयी विचारलं जातं तेव्हा तो नेहमीच गमतीशीर उत्तरं देऊन हा प्रश्न टाळाताना दिसतो. पण लग्न न करण्यामागचं कारण काही दिवसांपूर्वी त्यानं एका टीव्ही शोमध्ये सांगितलं होतं.

सलमान खाननं स्वतःच या गोष्टीचा खुलासा केला की, कपिल शर्मा शोमध्ये संजयमुळे माझं लग्न झालेलं नाही. संजय दत्तमुळे सलमानचा लग्नावरील विश्वास उडाला. यामागे एक मजेशीर किस्सा देखील आहे. जो सलमाननं कपिल शर्मा शोमध्ये सांगितला होता. कसा त्याचा लग्नावरील विश्वास उडाला आणि त्याला लग्नाची भीती वाटू लागली याचा किस्सा सलमाननं भारत सिनेमाच्या प्रमोशनच्यावेळी शेअर केला. सलमाननं सांगितलं, संजूबाबा म्हणजेच संजय दत्तची परिस्थिती पाहिल्यावर मला कधीच लग्न करण्याची इच्छा झाली नाही. सलमाननं सांगितलेला हा किस्सा त्यावेळी सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.

अभिनेत्रींसाठी लग्नाचं योग्य वय काय? 'हे' वाचून तुमचे सर्व भ्रम होतील दूर

सलमाननं म्हणाला, एकदा संजूबाबा मला लग्नाचे फायदे सांगत होता आणि मला समाजावत होता की मी आता लग्न करायला हवं. त्यानं मला सांगितलं लग्न हे आयुष्यातली सर्वात चांगली गोष्ट असते. तुम्ही शूटवरून थकून घरी येता तेव्हा तुमची बायको तुमची काळजी घेते. तम्हाला हवं नको ते पाहते. पण हे सर्व सुरू असताना त्याचा फोन सतत वाजत होता. शेवटी मला थांबवून त्यानं फोन रिसिव्ह केला. एवढं बोलून सलमान जोरजोरात हसू लागला.

मुहूर्त ठरला? मलायकाच्या आई-बाबांना भेटायला मध्यरात्री घरी पोहोचला अर्जुन कपूर

ही गोष्ट वाचायला एवढी मजेशीर वाटत नसली तरीही सलमानचा सांगण्याचा अंदाज पाहिला तर कोणालाच हसू आवरणार नाही. सलमान आणि संजय खूप चांगले मित्र आहेत. त्यांनी एकत्र ‘चल मेरे भाई’, ‘साजन’ आणि ‘दस’ यासारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे.

कार्तिक आर्यनसोबत बाइकवर बसण्यासाठी सारा अली खान घेते पैसे? VIDEO VIRAL

=========================================================

'...यावर एकच उपाय नाटकात काम न करणं', का भडकला सुबोध भावे? पाहा VIDEO

First published: July 29, 2019, 11:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading