माधुरी दीक्षित, प्रियांकानंतर आता बाॅलिवूडचा 'बाबा' घेऊन येतोय मराठी सिनेमा

माधुरी दीक्षित, प्रियांकानंतर आता बाॅलिवूडचा 'बाबा' घेऊन येतोय मराठी सिनेमा

बाॅलिवूडमधले बरेच कलाकार मराठी सिनेमाकडे वळलेत. प्रियांका चोप्रा, रितेश देशमुख, अजय देवगण, जाॅन अब्राहम असे अनेक जण मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी काम करतायत.

  • Share this:

मुंबई, 30 आॅक्टोबर : बाॅलिवूडमधले बरेच कलाकार मराठी सिनेमाकडे वळलेत. प्रियांका चोप्रा, रितेश देशमुख, अजय देवगण, जाॅन अब्राहम असे अनेक जण मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी काम करतायत. त्यांनी सिनेमांची निर्मिती केलीय. आता त्यात आणखी एका नावाची भर पडलीय.

बाॅलिवूड अभिनेता संजय दत्त मराठी सिनेमाची निर्मिती करतोय. स्वत: त्यानं ट्विट करून ही माहिती दिलीय. ब्लूमस्टँग प्राॅडक्शनसोबत संजय दत्त हा मराठी सिनेमा निर्मित करतोय. या सिनेमात अभिजीत खांडकेकर, दीपक धोब्रिया, स्पृहा जोशी आणि नंदिता धुरी यांच्या भूमिका आहेत. सिनेमाचं अजून नाव ठरायचंय. पण शूटिंग सुरू आहे.

काही महिन्यांपूर्वी संजय दत्तवरचा सिनेमा संजू रिलीज झाला आणि बाॅक्स आॅफिसवर सुपरडुपर हिट ठरला. याशिवाय  प्रस्थानम या तेलगू सिनेमाचा हिंदी रिमेकची निर्मिती तो करतोय. या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज झालं. सिनेमाचा मुहूर्त नर्गिसच्या जन्मदिनी झाला होता. तर सिनेमाचं शूटिंग सुनील दत्त यांच्या जन्मदिनी सुरू केलं होतं. प्रस्थानम सिनेमात संजय दत्तची मुख्य भूमिका आहे.

संजू सिनेमात नर्गिसची भूमिका करणारी मनीषा कोईरला या सिनेमात संजय दत्तबरोबर आहे. ती संजय दत्तच्या पत्नीची भूमिका करतेय.

हक्क दिलात तर रामायण सुरू, खेचून घेतलंत तर महाभारत, ही सिनेमाची कॅचलाईन. सिनेमात जॅकी श्रॉफ, अमायरा दस्तूर, चंकी पांडे, अली फजल यांच्याही भूमिका आहेत. तेलगू प्रस्थानमचा दिग्दर्शक देवा कट्टा हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहे. सिनेमाचं बरंचसं शूटिंग लखनौला होणार आहे.

अखेर राकेश शर्मांची भूमिका करणार 'हा' सुपरस्टार

First published: October 30, 2018, 1:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading