'देव पुन्हा एकदा त्याची परीक्षा घेतोय...', कॅन्सरशी लढणाऱ्या संजय दत्तच्या पत्नीची प्रतिक्रिया

'देव पुन्हा एकदा त्याची परीक्षा घेतोय...', कॅन्सरशी लढणाऱ्या संजय दत्तच्या पत्नीची प्रतिक्रिया

कॅन्सरचे निदान झालेल्या संजय दत्तला तातडीने अमेरिकेत पुढील उपचारासाठी नेण्यात येणार आहे. दरम्यान संजय दत्तची पत्नी मान्यताची आजारपणाबाबत अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे.

  • Share this:

मुंबई, 12 ऑगस्ट : मंगळवारी बॉलिवूडला धक्का देणारी आणखी एक बातमी समोर आली. प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तच्या (Sanjay Dutt) आजारपणाबाबत समोर आलेली ही बातमी त्याच्या चाहतेवर्गासाठी धक्कादायक होती.  काही दिवसांपूर्वी मुंबईत लीलावती रुग्णालयात दाखल झालेल्या संजय दत्तला कॅन्सर असल्याचं निदान झालं आहे. त्याला Lung Cancer असून तो तिसऱ्या स्टेजवर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संजय दत्तला तातडीने अमेरिकेत पुढील उपचारासाठी नेण्यात येणार आहे. दरम्यान संजय दत्तची पत्नी मान्यताची आजारपणाबाबत अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. संजय दत्त कॅन्सरशी लढा देत आहे हे समजल्यावर त्याचे चाहते आणि बॉलिवूड कलाकार त्याच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत आहेत.

संजयची पत्नी मान्यता हिने एक अधिकृत प्रतिक्रिया जारी करून संजय दत्त लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करणाऱ्या आणि त्याच्या हितचिंतकांचे आभार मानले आहेत. यामध्ये तिने असे म्हटले आहे की, संजय दत्त आणि परिवारासाठी हा कठीण काळ आहे. याआधीही संजय आणि त्याच्या परिवाराने कठीण प्रसंगाशी सामना केला आहे. संजयने नेहमी या परिस्थितीशी धैर्याने सामना केला आहे. हा काळ देखील निघून जाईल, संजयला देवाने पुन्हा एकदा एका परीक्षेसाठी निवडले आहे आणि यामध्ये संजय जिंकेल.

(हे वाचा-संजय दत्तच्या आजारपणामुळे पुढे ढकलण्यात आलेला Sadak-2 चा ट्रेलर)

मान्यताने चाहत्यांना असे आवाहन केले आहे की, त्यांनी त्यांची सकारात्मकता, प्रेम आणि प्रार्थना सुरू ठेवाव्यात. मात्र त्यांनी कोणत्याही अफवा किंवा चुकीच्या बातम्यांकडे लक्ष देऊ नये केवळ संजयसाठी प्रार्थना करा.

दरम्यान कॅन्सरला मोठ्या धीराने हरवणाऱ्या युवराज सिंह याने देखील संजय दत्तच्या स्वास्थ्यासाठी ट्वीट केले आहे. युवराजने देखील संजयच्या स्पीडी रिकव्हरीसाठी प्रार्थना केली आहे.

युवराजने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, 'तू नेहमी लढवय्या राहिला आहेस. मला यामधील यातना माहित आहे पण मला हे देखील माहित आहे की तू खंबीर आहेस आणि हा कठीण काळ देखील जाईल.'

(हे वाचा-युरोपमध्ये ते चित्र पाहून सुशांतची मानसिक स्थिती बिघडू लागली,रियाचा ED समोर दावा)

श्वास घेण्यास त्रास होत असल्याने 8 ऑगस्टला संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्याची Corona चाचणीसुद्धा झाली. Covid-19 चा रिपोर्ट निगेटिव्ह आला म्हणून दत्त कुटुंबीयांना दिलासा मिळाला असतानाच आता ही धक्कादायक बातमी आली होती.

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 12, 2020, 2:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading