बॉलिवूडचा ‘बाबा’ आता मराठी सिनेसृष्टीत करणार दमदार एण्ट्री

बॉलिवूडचा ‘बाबा’ आता मराठी सिनेसृष्टीत करणार दमदार एण्ट्री

sanjay dutt सर्व अडचणीवर मात करून एक कुटुंब एकत्र राहण्याचा कसा प्रयत्न करते, याची ही ‘कडू-गोड’ प्रसंगांनी भरलेली कथा आहे.

  • Share this:

मुंबई, 19 जून- हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गाजलेले चित्रपट दिलेला लोकप्रिय व रसिकांचे भरभरून प्रेम मिळालेला सुपरस्टार संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता यांनी आता मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे. ते ‘बाबा’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ‘संजय एस दत्त प्रॉडक्शन्स’ आणि अशोक सुभेदार व आरती सुभेदार यांच्या ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’बरोबरीने बाबा सिनेमाची सह-निर्मिती केली आहे. ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’ने याआधी ‘बकेट लिस्ट’ या माधुरी दीक्षितची प्रमुख भूमिका असलेल्या तिच्या पहिल्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. नुकतेच ‘बाबा’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रकाशित करण्यात आले. हा चित्रपट २ ऑगस्ट २०१९ रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

हृतिकची बहीण सुनैना रोशन म्हणाली, माझं समर्थन कंगनाला!

‘बाबा’मध्ये ‘तनु वेडस मनु रिटन्स’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजाविलेला दीपक डोब्रियाल मुख्य भूमिकेत असेल. त्याचाही हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. नंदिता धुरी पाटकरसुद्धा या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर आणि लोकप्रिय बालकलाकार आर्यन मेंघजी यांच्याही या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज आर गुप्ता यांनी केले आहे. ते ‘बकेट लिस्ट’चे सह-दिग्दर्शक होते. त्यांनी ‘धागा’ या मराठी लघुपटाचे ‘झी५’साठी दिग्दर्शन केले होते.

या स्टार कपलने ४० दिवस साजरं केलं हनिमून, प्रेग्नंसीच्या प्रश्नावर दिलं उत्तर


Loading... 

View this post on Instagram
 

Dedicating our first Marathi film “BABA” to the person who remained steadfast in my life through everything! Love you Dad. #BabaOn2Aug - produced under the banner of @sanjayduttsproductions & @bluemustangcreations Directed By: @picturewalaraj Written By: #ManishSingh #DeepakDobriyal @mi_nandita @abhijeetkhandkekar @spruhavarad @shaileshdatar @jaywantwadkar @chittaranjangiri1006 #AryanMenghji #RohanRohan #RohanPradhan @rohangoks @maanayata @Sandy_Bhargava @abhijitchawathe @nutcase19 @nh_studioz @ashok.subhedar @bhaarti_subhedar @vizualjunkies


A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay) on

संजय दत्तने ट्वीट करून आपले वडील सुनील दत्त यांना हा चित्रपट समर्पित केला. "आमचा पहिला मराठी चित्रपट 'बाबा', माझ्या मागे प्रत्येक बाबतीत खंबीरपणे उभी राहिलेल्या अशा व्यक्तिस समर्पित करत आहे. लव्ह यू डॅड!," संजय म्हणतो. मान्यता दत्तने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, "आमचा पहिला मराठी चित्रपट 'बाबा' आम्ही सुनील दत्त साहेबांना समर्पित करत आहोत. त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे आमचा आत्मविश्वास नेहमीच द्विगुणित होत गेला."

'माझी फिगर पाहा,' आक्षेपार्ह फोटो शेअर केल्याने भाजपच्या महिला नेत्या भडकल्या


“बाबा’ ही मनीष सिंग यांनी लिहिलेली कथा असून यात वडील आणि त्यांच्या मुलाची कथा सांगण्यात आली आहे. महाराष्ट्रातील निसर्गरम्य अशा कोकणातील एका सुंदर गावात ही कथा आकारली जाते. ही कथा प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकाच्या मनाला भिडेल अशी आहे, कारण त्यात एक साधेपणा आणि सोज्वळता आहे, असं वक्तव्य सिनेमाच्या निर्मात्यांनी केलं.

‘बाबा’चे दिग्दर्शक राज आर गुप्ता म्हणाले, “भावनांना भाषा नसते. ही गोष्ट आमच्या चित्रपटातील कलाकारांनी अगदी योग्यपणे अधोरेखित केली आहे. सर्व अडचणीवर मात करून एक कुटुंब एकत्र राहण्याचा कसा प्रयत्न करते, याची ही ‘कडू-गोड’ प्रसंगांनी भरलेली कथा आहे.”

माजी मिस इंडियासोबत झाले असे काही की तुम्हालाही येईल तिची दया

VIDEO: बिग बी अमिताभ बच्चन यांची नात का होतेय ट्रोल?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 19, 2019 03:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...