Home /News /entertainment /

'मुलीला हेच संस्कार दिलेस का?' युजरचा संजय दत्तला सवाल, वाचा नेमकं काय झालं

'मुलीला हेच संस्कार दिलेस का?' युजरचा संजय दत्तला सवाल, वाचा नेमकं काय झालं

त्रिशालानं शेअर केलेल्या एका फोटोवर एका युजरनं संजय दत्तनं मुलीला दिलेल्या संस्कारांवर सवाल उपस्थित केले.

    मुंबई, 29 एप्रिल : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्रिशालानं तिच्या बालपणीचा आईसोबतचा फोटो शेअर केला होता. ज्यामुळे ती बरीच चर्चेत आली होती. त्यानंतर आता नुकत्याच शेअर केलेल्या एका थ्रोबॅक फोटोमुळे त्रिशाला पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. त्रिशालानं शेअर केलेल्या एका फोटोवर एका युजरनं संजय दत्तनं मुलीला दिलेल्या संस्कारांवर सवाल उपस्थित केले होते. ज्यावर त्रिशालानं या युजरला सडेतोड उत्तर दिलं आहे. संजय दत्तटची मुलगी त्रिशाला दत्त तिच्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे नेहमीच चर्चेत राहते. नुकताच तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक बोल्ड फोटो शेअर केला होता. यावर कमेंट करताना एका युजरनं लिहिलं, मी हे पाहून हैराण आणि निराश आहे की, तू स्वतः एक डॉक्टर आहेस. न्यूयॉर्कमध्ये 40% कोरोना संक्रमित केस आहेत. असं असताना सुद्धा तू मास्क न लावता आणि लहान कपडे घालून रस्त्यावर उभी आहेस. आईच्या मृत्यूनंतर इरफान खानची तब्येत बिघडली, कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू या युजरनं पुढे लिहिलं, तुला फॉलो करणाऱ्या लोकांना तू काय आदर्श देत आहेस. तुझा बॉयफ्रेंड गेल्यावर जशी तू रडत होतीस तशी वेळ तुझ्या वडीलांवर यावी असं तुला वाटतं का? या पोस्टमध्ये या युजरनं संजय दत्तला टॅग केलं आहे. त्यात त्यानं लिहिलं, संजय दत्त तुम्ही मुलीला हेच शिकवलं आहे का? हेच संस्कार दिले आहेत का? ज्यात काही कॉमन सेन्सच नाही. माझा सल्ला आहे की घरी राहा शांत राहा आणि आराम करा. युजरची ही कमेंट वाचल्यावर त्रिशालाला राग अनावर झाला. तिनं त्याला सडेतोड उत्तरही दिलं आहे. तिनं लिहिलं, तुम्ही मला सामान्य ज्ञान समजावत आहात. जर तुम्ही कॅप्शन वाचलं असतं तर कदाचित तुम्हाला ज्ञान मिळालं असतं. TBT म्हणजे हा फोटो खूप अगोदर क्लिक केलेला आहे. हा फोटो अलिकडच्या काळात क्लिक केलेला नाही. माझ्या पेजवर येऊन अशा प्रकारच्या गोष्टी बोलण्याआधी माझं कॅप्शन नीट वाचा आणि माझ्या वडीलांना यात टॅग करण्याचा काहीही उपयोग होणार नाही. पण प्रयत्न चांगला होता. संजय दत्तची पहिली पत्नी ऋचा शर्माचं 1996 मध्ये ब्रेन ट्यूमरनं निधन झालं आहे. त्रिशालाचं पालन-पोषण तिच्या आजी-आजोबांनी केलं होतं. ती त्यांच्यासोबत अमेरिकेत राहते. बॉलिवूडपासून दूर असलेली त्रिशाला सोशल मीडियावर मात्र कमालीची सक्रिय आहे आणि तिचा चाहता वर्ग सुद्धा मोठा आहे. टेलिव्हिजनवरील लक्ष्मणाचा या अभिनेत्रीबरोबर रोमान्स, PHOTO सोशल मीडियावर व्हायरल 'सीता' दीपिका चिखलिया यांनी शेअर केला माजी पंतप्रधान राजीव गांधींबरोबरचा PHOTO
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Bollywood, Sanjay dutt

    पुढील बातम्या