KGF 2 : अधीराचा फर्स्ट लुक आउट, वाढदिवसाला संजय दत्तकडून चाहत्यांना गिफ्ट

KGF 2 : अधीराचा फर्स्ट लुक आउट, वाढदिवसाला संजय दत्तकडून चाहत्यांना गिफ्ट

KGF या साउथ सिनेमाच्या यशानंतर आता सिनेमाच्या मेकर्सनी सिक्वेलसाठी बॉलिवूडमधील तगड्या स्टारकास्टला साइन केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 29 जुलै : साउथ सिनेमा KGF मागच्या वर्षी बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. साउथ अभिनेता यश स्टारर या सिनेमाच्या यशानंतर आता सिनेमाच्या मेकर्सनी सिक्वेलसाठी बॉलिवूडमधील तगड्या स्टारकास्टला साइन केलं आहे. यातीलच एक कलाकार म्हणजे संजय दत्त. संजूबाबा ‘KGF 2’ मध्ये अधीराच्या भूमिकेत दिसत आहे. आज संजय दत्त 60 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्तानं आजच या सिनेमाचं पहिलं पोस्टर आणि संजय दत्तचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला.

‘KGF 2’मधील अधीराच्या गेटअपमध्ये संजय दत्तचा भंयकर आणि इंटेस लुक पाहायला मिळत आहे. या पोस्टरवर संजय दत्तनं त्याचा चेहरा स्कार्फनं अर्धवट झाकला असून हा लुक संजय दत्तवर खूपच सूट करतोय. संजय दत्तनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर अधीराच्या लुकमधील पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत KGF च्या मेकर्सचे आभार मानले. त्यानं लिहिलं, धन्यवाद, KGF मधील अधीराच्या भूमिकेसाठी मी खूप खूश आणि उत्साहित आहे. साउथ मधील संजयच्या दमदार एंट्रीनं सर्वांची मनं जिंकली आहेत.

या २ लग्न करणाऱ्या ‘खलनायका’मुळे माझं लग्न राहिलं - सलमानचा गौप्यस्फोट

संजय दत्तच्या या फर्स्ट लुकवर त्याच्या चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. एका युजरनं लिहिलं, ‘KGF 2’ मध्ये मुन्ना भाई विरुद्ध रॉकी भाई पाहायला मी खूपच उत्सुक आहे. तर अनेक चाहत्यांनी हा सिनेमा या वर्षातील सर्वात मोठा सिनेमा असल्याचं म्हटलं आहे.

सुबोध भावे नाटकात काम करणार नाही? या कारणानं संताप अनावर

या सिनेमामध्ये रवीना टंडन सुद्धा दिसणार असल्याचं बोललं जात आहे. सुत्रांच्या माहितीनुसार या सिनेमात रवीना भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात तिची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन प्रशांत नील करत असून आता बॉलिवूडमधील कलाकारांना साइन केल्यांनंतर या सिनेमाला किती फायदा होतो याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

अभिनेत्रींसाठी लग्नाचं योग्य वय काय? 'हे' वाचून तुमचे सर्व भ्रम होतील दूर

============================================================================

'...यावर एकच उपाय नाटकात काम न करणं', का भडकला सुबोध भावे? पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2019 02:22 PM IST

ताज्या बातम्या