Home /News /entertainment /

कॅन्सरवर मात करत संजय दत्तने केवळ 5 दिवसांत पूर्ण केलं शूटींग; या सिनेमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

कॅन्सरवर मात करत संजय दत्तने केवळ 5 दिवसांत पूर्ण केलं शूटींग; या सिनेमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

आजारातून बरं झाल्यानंतर संजयनं (Sanjay Dutt) चित्रपटांच्या शूटींगला सुरुवातही केली आहे. विशेष बाब म्हणजे त्यानं नुकतंच आपल्या एका सिनेमाचं चित्रीकरण केवळ 5 दिवसामध्ये पूर्ण केलं आहे.

  मुंबई, 2 फेब्रुवारी : कर्करोगाविरूद्धची लढाई जिंकल्यानंतर बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेत आहे. आजारातून बरं झाल्यानंतर संजयने चित्रपटांच्या शूटींगला सुरुवातही केली आहे. विशेष बाब म्हणजे त्यानं नुकतंच आपल्या एका सिनेमाचं चित्रीकरण केवळ 5 दिवसामध्ये पूर्ण केलं आहे. यासाठी दिग्दर्शकानं अभिनेत्याचं कौतुकही केलं आहे. संजय दत्त आगामी पृथ्वीराज (Film Prithviraj) या सिनेमामध्ये अक्षय कुमारसोबत झळकणार आहे. याच सिनेमाचं चित्रीकरण अभिनेत्यानं केवळ 5 दिवसात पूर्ण केलं आहे. अक्षय कुमारनं या सिनेमाचं चित्रीकरण आधीच पूर्ण केलं होतं. त्यामुळं, आता केवळ संजय दत्तच्या सीनचं चित्रीकरण बाकी होतं. या सिनेमात पहिल्यांदाच अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि संजय दत्तसोबत पूर्व मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरही (Manushi Chillar) झळकणार आहे. मानुषी या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती पृथ्वीराज यांची पत्नी संयोगिताची भूमिका साकारणार आहे.

  (वाचा - करण जोहरचा ड्रीम प्रोजेक्ट 'तख्त' बंद होणार? वाचा काय आहे कारण)

  हा सिनेमा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित असून यात संजय दत्त महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. संजय दत्तनं या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण केल्यानंतर दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी म्हणाले, की संजय दत्तच्या भूमिकेच्या काही भागाचं चित्रीकरण बाकी होतं. कोरोना आणि संजयच्या तब्येतीची काळजी घेत सेटवर सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या. संजय अत्यंत प्रोफेशनल कलाकार आहे आणि या सिनेमात त्याचा सहभाग आहे, या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे. त्याची तब्येत बिघडल्यानं आम्ही सगळे काळजीत होतो. मात्र, त्यानं दाखवून दिलं, की तो एक फायटर आहे आणि कोणत्याही परिस्थितीत तो हार मानणार नाही. संजय दत्तचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर यशराज फिल्मसनं पृथ्वीराज सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे.

  (वाचा - पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर ऋतिक ढसाढसा रडला, 'हे' होतं कारण)

  दिग्दर्शक चंद्र प्रकाश द्विवेदी (Chandra Prakash Dwivedi) आपल्या मोहल्ला अस्सी या चित्रपटामुळं चर्चेत होते. यानंतर आता आणखी एक मोठा चित्रपट घेऊन ते प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. पृथ्वीराज हा यशराज फिल्मसच्या 50 वर्षाच्या इतिहासातील सर्वात मोठा ऐतिहासिक चित्रपट असल्याचं म्हटलं जात आहे. हा सिनेमा यंदाच्या वर्षातच प्रदर्शित होणार आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Akshay Kumar, Bollywood, Sanjay dutt

  पुढील बातम्या