Home /News /entertainment /

बॉलिवूडमधून आणखी एक धक्कादायक बातमी; संजय दत्तला कॅन्सर

बॉलिवूडमधून आणखी एक धक्कादायक बातमी; संजय दत्तला कॅन्सर

काही दिवसांपूर्वी मुंबईत लीलावती रुग्णालयात दाखल झालेल्या संजय दत्तला नेमकं काय झालं आहे याचा धक्कादायक उलगडा निकटवर्तीयाच्या Tweet मधून झाला आहे.

    मुंबई, 11 ऑगस्ट : अभिनेता संजय दत्तबद्दल एक मोठी बातमी आली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत लीलावती रुग्णालयात दाखल झालेल्या संजय दत्तला कॅन्सर असल्याचं निदान झालं आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने 8 ऑगस्टला संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्याची Corona चाचणीसुद्धा झाली. Covid-19 चा रिपोर्ट निगेटिव्ह आला म्हणून दत्त कुटुंबीयांना दिलासा मिळाला असतानाच आता ही धक्कादायक बातमी आली आहे. चित्रपट व्यवसायाविषयीचे अभ्यासक आणि संपादक संजय नहाटा यांनी याबाबतचं Tweet केलं आहे. 61 वर्षीय संजय दत्त यांना फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचं निदान झालं आहे. त्यंना पुढच्या उपचारांसाठी अमेरिकेला न्यायचा विचार असल्याचं समजतं. 'मी कामापासून काही काळ ब्रेक घेणार आहे. लवकरच परत येईन.' असं संजूबाबाने Tweeter वर लिहिलं होतं. माझ्या चाहत्यांनी आणि हितचिंतकांनी उगाच अफवा पसरवू नयेत. माझे कुटुंबीय माझ्या बरोबर आहेत आणि काही वैद्यकीय उपचारांसाठी मी ब्रेक घेतोय, असं संजयने काही तासांपूर्वीच जाहीर केलं होतं. तेव्हापासूनच चर्चांना उधाण आलं होतं. अखेर संजय दत्तला नेमकं काय झालं याचा उलगडा झाला आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या