News18 Lokmat

संजय दत्तने 5 वर्षांनंतर केलं टि्वट, 'भूमि'चं पोस्टर केलं पोस्ट !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 29, 2017 10:43 PM IST

संजय दत्तने 5 वर्षांनंतर केलं टि्वट, 'भूमि'चं पोस्टर केलं पोस्ट !

आज 29 जूलै :  अभिनेता संजय दत्त त्यांचा वाढदिवस सेलिब्रेशिन करतोय. त्यांचासाठी हा दिवस खूप खास बनला कारण त्यांच्या 'भूमि' चित्रपटचा दुसरा पोस्टर रिलीज झाला. विशेष म्हणजे संजूबाबाने  तब्बल 5 वर्षांनंतर टि्वट केलंय.

या पोस्टरमध्ये संजय दत्तचा चेहरा रक्ताने आणि मातीने माखलेला आहे. तसंच चेहऱ्यावर राग आणि डोळ्यांमध्ये दु:ख स्पष्ट दिसून येत आहे. हा पोस्टर गेल्या पाच वर्षांनंतर संजय दत्तने ऑफिशियल ट्विटर हॅडलवरुन शेअर केला आहे. जेलमधून बाहेर आल्यानंतर संदय दत्त आता ओमंग कुमार यांच्या 'भूमि' चित्रपटामुळे मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

'भूमि' या चित्रपटाची कथा वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारित आहे, यांमध्ये बदला घेणे आणि इमोशन्स खूप आहेत.

काहि दिवसांपूर्वी या चित्रपटाचा पहिला पोस्टर रिलीज झाला,त्यामध्ये संजयचा साइड लुक बघायला मिळाला त्यात तोंडातून रक्त येत होते. हा पोस्टर लोकांना खूप आवडला आणि आता अशी अपेक्षा आहे,की हा दुसरा पोस्टरसुद्धा चित्रपट बघण्याचा उत्साह वाढवेल.

संजय दत्त आणि अदिति राव यांचा हॅदरीचा रोल असणारा हा चित्रपट 22 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 29, 2017 10:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...