मुंबई, 21 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी सामना करत असल्याच्या बातम्या गेले काही दिवस समोर येत होत्या. दरम्यान त्याच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या लाखो-करोडो चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्करोगाविरुद्धची ही लढाई संजय दत्त जिंकला आहे. सोशल मीडियावर स्वत: पोस्ट करत संजय दत्तने याबाबत माहिती दिली आहे. संजय दत्तने त्याच्या मुलांच्या वाढदिवशी ही बातमी शेअर करताना खूप आनंद होत असल्याचे म्हटले आहे. ही पोस्ट शेअर करताना त्याच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांचे, कुटुंबीयांचे, कोकिलाबेन रुग्णालयातील स्टाफचे आणि देवाचे आभार मानले आहेत. त्याने केलेल्या या सोशल मीडियावर पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडला आहे. सर्वांचा लाडका संजूबाबा बरा व्हावा याकरता गेले अनेक महिने चाहते प्रार्थना करत आहेत.
संजय दत्तने या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, 'गेले काही आठवडे माझ्या कुटुंबीयांसाठी आणि माझ्यासाठी कठीण होते. पण असं म्हणतात ना , देव त्याच्या शक्तिशाली शिपायांना कठीण लढाईच देतो. आणि आज माझ्या मुलांच्या वाढदिवशी या लढाईत विजयी झाल्याने मी खूप आनंदी आहे आणि त्यांना आरोग्य आणि त्यांची योग्य देखरेख हे बेस्ट गिफ्ट देण्यासाठी सक्षम आहे. तुमचा विश्वास आणि समर्थनाशिवाय हे शक्य नव्हतं. मी माझ्या कुटुंबाचा मनापासून आभारी आहे आणि त्या चाहत्यांचा देखील, जे या कठीण परिस्थितीत देखील माझ्या बाजुने उभे राहिले आणि माझ्या मजबुतीचा स्रोत झाले. तु्म्ही मला दिलेलं प्रेम आणि अगणित आशीर्वादांसाठी धन्यवाद.'
(हे वाचा-YRFकडून आणखी एका स्टार किडला संधी, याआधी प्रसिद्ध दिग्दर्शकाने केलं होतं रिजेक्ट)
चाहत्यांबरोबरच संजय दत्तने कोकिलाबेन रुग्णालयातील स्टाफचे देखील आभार मानले आहेत. तो असं म्हणाला की, 'मी विशेषत: डॉ. सेवंती आणि त्यांची टीम, नर्स आणि कोकिलाबेन रुग्णालयाच्या मेडिकल स्टाफचा आभारी आहे, ज्यांनी गेल्या काही आठवड्यात माझी एवढी चांगली काळजी घेतली. खूप सारे धन्यवाद'.
View this post on InstagramMy heart is filled with gratitude as I share this news with all of you today. Thank you 🙏🏻
अभिनेता संजय दत्तला (Sanjay Dutt) 8 ऑगस्ट रोजी श्वसनाच्या त्रासामुळे लीलावती रुग्णालयात भरती केले होते. यानंतर 3 दिवसांनीच 11 ऑगस्टला हे समोर आले होते की, संजय दत्त फुप्फुसांच्या कर्करोगाशी सामना करत आहे.
संजय दत्तच्या पोस्टनंतर चाहते अनेक कमेंट्स करत आहेत. लवकरच संजय दत्त केजीएफ पार्ट 2 मध्ये दिसणार आहे. त्यामुळे चाहते अधिक उत्सुक आहेत. त्यांच्या लाडक्या अभिनेत्याने कॅन्सरला हरवल्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.